ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

बाल कीर्तनकार श्रावणी दिदी गव्हाणे यांचा संकल्प वास्तु सोसायटी च-होली येथे कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न.

अहिल्यानगर प्रतिनिधी - संगीता खिलारी

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ संकल्प वास्तू चऱ्होली.

स्थापना 2023 चऱ्होली परिसरात तीन वर्षापूर्वी स्थापन झालेले संकल्प वास्तू सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे गणेश उत्सवाच्या काळामध्ये विविध समाज उपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहामध्ये गणेश उत्सव साजरा करत असते.

चालू वर्षीही संकल्प वास्तू गणेशोत्सव मंडळाच्या वतीने कीर्तनाचा कार्यक्रम असेल भारुडाचा कार्यक्रम असेल त्याचबरोबर लहान मुलांसाठी विविध स्पर्धा असतील, महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गणेश भक्तांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटत आहे. चालू वर्षी बाल कीर्तनकार ह.भ.प श्रावणीदिदी गव्हाणे यांचा हरी कीर्तनाचा कार्यक्रम गणेश उत्सवाच्या निमित्ताने संपन्न झाला.

यावेळी ह.भ.प विठ्ठल गव्हाणे महाराज, ह.भ.प यशवंत फाले महाराज, नांदेड सिटी पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या, पत्रकार, युवा ग्रामीण पत्रकार संघ पुणे जिल्हा सचिव अनघलक्ष्मी दुर्गा मॅडम व कात्रज पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष कांताभाऊ राठोड कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

भारुड सम्राट गोरख महाराज तुपे यांचा समाज प्रबोधनपर भारुडाचा कार्यक्रमही चालू वर्षी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे. संकल्प वास्तू सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष मिलिंदभाऊ चवरे त्याचबरोबर सचिव डॉक्टर अश्विनी गायकवाड मॅडम तसेच खजिनदार श्री.अरुण तांभुरे आणि मंडळाचे सर्व सदस्य यांच्या प्रयत्नातून यशस्वीपणे हा कार्यक्रम संपन्न होत आहे.

पुढील काळातही अशाच प्रकारे विविध समाज उपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून विविध उत्सव संपन्न करण्याचा मनोदय मंडळाचे अध्यक्ष तसेच सर्व सदस्यांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे