ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणब्रेकिंगमहाराष्ट्र

हृदयविकाराच्या मृत्यूमध्ये झालेली वाढ करोना लसींशी संबंधित नसल्याचे स्पष्ट. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अहवालानं केलं स्पष्ट

अहिल्यानगर

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तरूणांमध्ये हृदयविकारामुळे वाढत चाललेल्या मृत्यूंविषयी चिंता व्यक्त केली होती. तसेच तज्ज्ञांची समिती नेमून १० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते. यानंतर आता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

करोना लस आणि हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

देशात ४० वर्षांखालील प्रौढांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या प्रमाणामुळे चिंता व्यक्त होत असताना हे निष्कर्ष समोर आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले की, करोनावरील लसीकरण आणि तरूणांमध्ये वाढत असलेले हृदयविकाराचे प्रमाण यात कोणताही संबंध नाही.

राष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेल्या अभ्यासात जीवनशैली आणि आधीच्या आजारांना मृत्यूसाठी कारणीभूत ठरविण्यात आले आहे.

करोना महामारीनंतर अनेक ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्यामुळे तरूणांचे मृत्यू होत असल्याचे समोर आले. नाचताना, क्रिकेट खेळताना तरूणांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याचे व्हिडीओही व्हायरल झालेले आहेत. यामुळे अनेकदा भीती व्यक्त केली जात होती.अचानक कार्डियाक अरेस्टमुळे होणाऱ्या मृत्यूची अनेक कारणे असू शकतात, जसे की, अनुवांशिक, बदललेली जीवनशैली, आधीपासूनच असलेले आजार आणि करोनानंतर आरोग्याशी संबंधित निर्माण झालेले प्रश्न… असेही या निवेदनात म्हटले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे