
राज्यावर पाऊस रुसला की काय, असेच प्रश्न आता अनेकजण विचारताना दिसत आहेत. कारण, जुलै महिन्यात दडी मारलेल्या या पावसानं अद्यापही परतीची वाट धरलेली नाही.
महाराष्ट्रातील बहुतांश भागांध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसत असल्या तरीही या श्रावणसरी आहेत असंच अनेकांचं मत. त्यातच हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजामुळं आता चिंता आणखी वाढली आहे. कारण पावसाची सुट्टी आणखी लांबली आहे.
पुढील काही दिवसांमध्ये मान्सूनला पोषक स्थिती नसल्यामुळे किमान तीन दिवस तरी राज्यात पाऊस लपंडावाचा खेळ खेळणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
शुक्रवारी म्हणजेच 25 ऑगस्टपासून कोकणासह राज्याच्या घाटमाथ्यावरील परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.