ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

श्री चैतन्य टेक्नो सीबीएससी शाळेच्या ३०७ विद्यार्थ्यांचे प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवित यश.

अहिल्यानगर

नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये अहिल्यानगर मधील श्री चैतन्य टेक्नो शाळेच्या ३०७ विद्यार्थ्यांनी गणित प्रतिभा शोध, विज्ञान प्रतिभा शोध, सामान्य ज्ञान प्रतिभा शोध, इंग्रजी प्रतिभा शोध आधी विषयातील प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये प्रथम पात्रता परीक्षा उत्तीर्ण करीत महाराष्ट्र राज्यात अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

संपूर्ण भारतातून अनेक शाळा आपले विद्यार्थी या परीक्षेसाठी सहभागी करीत असतात. तरी महाराष्ट्र मध्ये सर्वाधिक विद्यार्थी सहभाग आणि सर्वाधिक यश मिळवण्याचा मान अहिल्यानगर येथील श्री चैतन्य टेक्नो या शाळेला मिळाला आहे. यामुळे अहिल्यानगर शहराचे नावलौकिक झाल्याचे दिसून येते.

यामध्ये विषयांवर MTSO (Mathematics Talent Search Olympiad) गणित १०२, STSO (Science Talent Search Olympiad) विज्ञान ९५, GTSO (General Knowledge Talent Search Olympiad) सामान्य ज्ञान २२ आणि ETSO (English Talent Search Olympiad) इंग्रजी ८८ विद्यार्थ्यांचा यशस्वी सहभाग होता.

सदर यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. के. एन्सी मॅडम व अकॅडेमिक डीन श्री. सुमन सर आणि शाखा विस्तार अधिकारी श्री. शशी कुमार सर, व सर्व शिक्षक वृंद आणि पालक वर्ग अभिनंदनचा वर्षाव करीत आहेत. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या, यावरून शालेय शिक्षणाबरोबर स्पर्धा परीक्षांचे ज्ञान हे शाळेतच घेण्यात येते हे सिद्ध होते.

सर्व विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे