ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

शिरूर तालुक्यातील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रात वॉटर स्लाइडवरून घसरताना महिलेचा कणा तुटला.

अहिल्यानगर

शिरूर तालुक्यातील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रात घडलेल्या गंभीर अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे. वॉटर स्लाइडवरून घसरताना झालेल्या दुर्घटनेत ३७ वर्षीय महिलेच्या पाठीच्या मणक्याचे चार तुकडे झाले असून, त्यामुळे तिच्या शरीराचा अर्धा भाग निकामी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला कुटुंबासोबत पर्यटनासाठी केंद्रात गेली होती. वॉटर स्लाइडचा आनंद घेत असताना अचानक तोल जाऊन ती जोरात आपटली. या अपघातात तिच्या पाठीला गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिच्या मणक्याला मोठी इजा झाल्याचे स्पष्ट केले.

या प्रकरणी निष्काळजीपणा आणि सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरून शिरूर पोलिस ठाण्यात पर्यटन केंद्राचा मालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे पर्यटन केंद्रांतील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एका महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे