ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगरमध्ये अल्पवयीन मुलीला डांबून अत्याचार

अहिल्यानगर मधील नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अल्पवयीन मुलीला डांबून ठेवत तिला बळजबरीने कुंटणखान्याच्या व्यवसायात ओढल्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही आरोपींनी तिला चुकीच्या कामासाठी प्रवृत्त केले. आरोपी याने पीडितेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्याने आपल्या ताब्यातील गाडीत पीडितेला बळजबरीने बसवून एका फ्लॅटवर नेले. तिथे तिला डांबून ठेवत तिची लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. या संपूर्ण प्रकरणात एका महिलेने देखील साथ दिल्याचा आरोप आहे.

​या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने आणि सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली आहेत.

नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ९६, ९८, ९९, ६४, १४०(४) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ​पोलीस उपनिरीक्षक गणेश गांगुर्डे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे