निमा वुमन्स फोरम तर्फे स्त्री सक्षमीकरण या विषयी कार्यशाळा संपन्न…..
अहिल्यानगर

निमा वुमन्स फोरम आणि पेमराज सारडा महाविद्यालय यांच्या संयुक्त विध्यमाने महिला सबलीकरण व सक्षमीकरण या अंतर्गत NWF च्या उपाध्यक्ष डॉ अंशु मुळे यांचे “अंतरबाह्य मी “ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले….
स्त्रियांनी मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम व्हावे व स्वतःचा व्यक्तिमत्व विकास करावा असे सांगितले याप्रसंगी तेजश्री विठ्ठल थोरात (सहाय्यक पोलीस निरीक्षक ) यांनीही महिलांना मार्गदर्शन केले समाजसेविका शुभांगी अनंत झेंडे यांनीही त्यांच्या संस्थेतर्फे महिलांसाठी निरनिराळे उपक्रम चालू आहेत हे स्पष्ट केले…
या वेळी निमा संघटनेचे डॉ रत्ना बल्लाळ व डॉ मानसी कांबळे या उपस्थित राहून सहकार्य केले..
एकूण २०० महिला व मुली उपस्थित होत्या ..या प्रसंगी विध्यर्थिनींनी स्त्री सक्षमीकरण या विषयी भित्ती चित्रान चे प्रदर्शन भरविले होते..
कॉलेज च्या प्रिन्सिपॉल गावित मॅडम यांचे सहकार्य लाभले..