ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी विविध मागण्यासाठी नगर कल्याण रोडने मंत्रालयाकडे पायी रवाना

अहमदनगर

अहमदनगर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी आणि इतर काही मागण्यांसाठी २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी मुंबईकडे पायी कूच केली असून अहमदनगर महानगरपालिकेचे कर्मचारी हे मुंबईकडे निघाले आहे.

महापालिका कामगार संघटनेने नगर ते मुंबई लाँगमार्च काढण्याचा इशारा दिला होता मात्र तरीही सरकारकडून अपेक्षित काहीही उत्तर मिळाले नसून वेळोवेळी बैठक घेऊनही काहीच साध्य न झाल्यामुळे आज महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी नगर ते मुंबई लॉंग मार्च सुरू केला .

सातवा वेतन आयोग लागू करावा.तसेच सफाई कर्मचार्‍यांना वारसा हक्काचे नोकरीचे लाभ मिळावेत या मागण्यांसाठी नगर ते मंत्रालय असा लाँगमार्च सुरू झाला आहे.शहरातील सिद्धार्थ नगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून या लॉंगमार्चला सुरुवात करण्यात आली त्यानंतर दिल्लीगेट मार्गे शहरातील प्रमुख मार्गांवरून, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून वाडिया पार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून या लाँग मार्चला सुरुवात करण्यात आली आहे.

जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आता माघार नाही अशी भूमिका महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

वेळोवेळी महापालिका अधिकाऱ्यांची चर्चा करून व बैठक घेऊनही चर्चा निष्फळ ठरल्यामुळे तसेच महापालिका युनियनने दिलेल्या नोटिसिला कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला असे महापालिका युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी बोलताना सांगितले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे