ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

वर्कफार्म होम जॉब देण्याचा बहाणा करून एकाची तब्बल १२ लाख ३६ हजारांची फसवणूक

अहमदनगर

वर्कफार्म होम जॉब देण्याचा बहाणा करून तब्बल १२,३६,२६७/- रू.ची ऑनलाईन फसणूक करणारे तीन आरोपीना सायबर पोलीस स्टेशनच्या पथकाने जेरंबद करून त्यांच्याकडून ५०,५४१८/- रू.जप्त केले आहे.

घटनेची हकीकत अशी की यातील फिर्यादी दत्तात्रय जयसिंग चोभे (रा.बाबुर्डी बेंद ता.नगर) यांना दि. २६/६/२०२३ ते दि.८/७/२०२३ दरम्यान +२३४८०२७२८५२४८ हा व्हॉटसअॅप नंबर धाकर व @seline७८२१३६ या टेलीग्राम धारक व्यक्तींनी इन्फो इज इंडीया लि.कंपनीचा अधिकारी असल्याचे बतावणी करून पार्ट टाईम जॉब देण्याचा बहाणा करून नमुद विविध बँकेचे खात्यात वेळोवेळी पैसे भरण्यास सांगून फिर्यादी यांची एकुण १२,३६२६७/- रू.( बारा लाख छत्तीस हजार दोनशे सदुसष्ट रूपये) रुपयाची फसवणुक केली आहे.

या फिर्यादीवरून गुन्हा रजि.दाखल करण्यात आला होता.गुन्हा दाखल झाल्या नंतर जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांच्या आदेशान्वये व अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या सुचना मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.संजय सोनवणे,सायबर पो.स्टे.यांचे नेतृत्वाखाली पोसई श्री.राहुल सानप, पोहेकॉ/योगेश गोसावी,राहुल हुसळे,पोना/अभिजीत अरकल,पोकॉ/गणेश पाटील, अरूण सांगळे,सफौ/शेख पथकातील कर्मचारी यांनी तांत्रीक तपास करून सदर गुन्हयात फसवणूक झालेली रक्कम हरीयाणा,गुजरात, उत्तरप्रदेश मध्य प्रदेश अशा विविध राज्यातील तसेच नाशिक येथील येस बँकेच्या अकाऊंट मध्ये फसवणूक झालेली रक्कम वर्ग झाली होती त्या अनुषंगाने नाशिक व मुंबई येथे तपास करून (१) हिरामण पंडीत सोनवणे रा.प्लॅट नं.५,प्रिन्स पॅलेस अपार्टमेंट,धात्रक फाटा, आडगांव नाशिक (२) शक्ती माणिकलाल कर्नावट रा.प्लॅट नं. २०४, बी, विंग. म्हाडा,आडगांव,नाशिक यांना प्रथम अटक करून त्या दोघांकडे सखोल तपास करता त्यांनी त्यांचा मुंबई येथील साथीदार (३) प्रथम भावेश गथाणी रा.प्राची बिल्डिंग पज्लॅट नंबर १२, नव्वद फुट रोड,घाटकोपर ईस्ट मुंबई याची माहिती दिल्याने त्यास मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले.

गुन्हयातील फसवणूक झालेली रक्कम विविध बॅकेत वर्ग झाली होती.त्याचा संबधीत बॅकेशी संपर्क करून गुन्हयात गेलेल्या रक्कमे पैकी ५०५४१८/- रू. फिर्यादी यांना परत करण्यात यश आले आहे.उवर्रीत रक्कमेचा सुध्दा पाठपुरावा व आरोपी यांचेकडून तपास करून परत मिळविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

गुन्हयातील अटक आरोपीची ३ दिवस पोलीस कोठडी घेण्यात आली असून सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक श्री.संजय सोनवणे, सायबर पोलीस स्टेशन हे करत आहेत.हि कामगिरी श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे सायबर पोलीस स्टेशन अ.नगर यांचे पथकाने केली आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे