
ऐतिहासिक अशा अहमदनगर शहरांमध्ये पद्मशाली समाजाचे लोक उदरनिर्वाहासाठी काही मराठवाड्यातून काही तेलंगणातून (आंध्र प्रदेश) अशा विविध भागातून इसवी सन १७८० ते १७९० च्या सुमारास अहमदनगर मध्ये काही भागांमध्ये लोक पायी आले . कारण त्यावेळी रेल्वे अस्तित्वात नव्हती पुढे सुमारे शंभर वर्षांनी म्हणजे १८७८ मध्ये दौड मनमाड रेल्वे सुरू झाली.
सर्वप्रथम आलेले घराण्यांपैकी काही माहितीतील नावे बिना, बोडके, गुंडू, बुर्गुल, मुत्त्याल, अरकल, पागा, जक्का, नक्का, येमुल, तिरीद्दे अशी काही मंडळी तेलंगणाच्या विविध भागातून मराठवाड्यातून अहमदनगर येथे येऊन आपला पिढीजात हातमाग व्यवसाय सुरू केला.
त्याकाळी येथे हातमागाच्या बोटांवर मोजता येतील इतके अल्प व्यवसायीक होते कापडाची मागणी इतके उत्पादन होत नव्हते त्यामुळे पद्मशाली लोकांना हातमाग व्यवसाय वाढविण्यास चांगली संधी मिळाली .
येथे व्यवसाय चांगला होतो व चांगला वाव आहे अशी बातमी काही काळातच तेलंगणापर्यंत पोहोचल्यावर त्यानंतर तेलंगणा या भागातून येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. सन १८२० च्या सुमारास येथे जवळपास २०० हातमाग चालत होते.
१८५० च्या सुमारास त्यांची संख्या नगर शहर व भिंगार दोन्ही मिळून १३०० ते १४०० पर्यंत झाले.
पद्मशाली समाजातील लोक येथे स्थायिक झाल्यानंतर येथील मातीमध्ये एकरूप होऊन सामाजिक कार्यामध्ये सहभागी होऊ लागले.
त्याकाळी समाजातील पंचांना मान होता त्यांनी दिलेल्या निर्णयानुसार व मार्गदर्शना प्रमाणे समाजातील सर्व लोक वागत. काही काळानंतर समाजाची लोकसंख्या बरीच वाढली समाजाच्या सामाजिक कार्यासाठी समाजातील लोकांमधुन त्या काळातील पंधरा समाज बांधवांची कारभारी म्हणून नेमणूक करून विविध भागातील समाज बांधवांचे अडी अडचणी न्याय निवडा अशी त्या पंधरा लोकांच्या माध्यमातून कामे होऊ लागली .
पुढील काळात समाजाला स्थैर्य प्राप्त करून देणे व सामाजिक ऐक्य कायम राखणे या अशा विविध गोष्टींकरिता समाज मंदिर उभारणी साठी जागा करून तेथे श्री मार्कंडेय देवालय बांधणे त्यात श्री मार्कंडेय मूर्तीचे प्रतिष्ठापना करणे,यासाठी उत्पन्न वाढवणे, शिक्षणाचा प्रसार करण, नगरपालिकेत प्रतिनिधित्व करण्यासाठी समाज बांधवांना प्रोत्साहन देणे, याशिवाय व्यवसाय वाढीस मदत करणे इत्यादी कार्य या पंचांच्या माध्यमातून व समाजातील काही प्रतिष्ठित बांधवांकडून होऊ लागले.
त्यानंतर सर्वप्रथम श्री मार्कडेय मंदिराकरिता गांधी मैदानातील त्या काळातील म्यु. नं ४०६९ व ४०७० ही जागा दिनांक २०/१०/ १८८८ रोजी समाजातील पूढार्यांनी ही जागा विकत घेतली त्या काळात कै. बालाय्या प पागावाड, व्यंकटी कृ बुगूल, लालय्या चं जक्का, लिंगय्या शि पागा, परमय्या उमाजी बोगावाड, लक्ष्मण पपय्या अरकल, मुकुंदा पापय्या मुत्त्याल, नरसय्या लिंगाय्या भिमनपेल्ली, पापय्या मेघन्ना बत्तीन, व्यंकटी गंगाराम रच्चा, रामाय्या राजन्ना बत्तुल, नरसय्या धर्माजी वडेपेल्ली, राजन्ना बालराज शिवरात्री यांचे नावे देवस्थानची जागा पंच म्हणून यांनी खरेदी केली.
यानंतर या खरेदी केलेल्या जागेवर श्री मार्कडेय मंदिराची उभारणी सुरू झाली व त्याकाळी जसे जसे पैसे जमत गेले त्याप्रमाणे बांधकाम पूर्णत्वाकडे जाऊ लागले. व १९२२ झाली बांधकाम पूर्ण झाल्यानंतर प्रतिष्ठापना झाली. पद्मशाली विनकर बांधव वस्त्र विणून दिवसभर वस्त्र विनल्यानंतर संध्याकाळी ती विकण्यासाठी बाजारात जात असत विक्रीतून पैशांमधून एका साडी मागे दीड पैसा मार्कंडेय देवस्थानला व अर्धा पैसा पांजरपोळ संस्थेला देण्याचे ठरले.
याशिवाय सन १९१४ पद्मशाली समाजातील पुढाऱ्यांनी देवस्थानच्या जागेतच छापखाना सुरू केला त्या माध्यमातून समाजातील काही लोकांना रोजगार मिळू लागला आणि तो व्यवसाय जवळपास ४० ते ५० वर्षापर्यंत अव्याहात चालू होता.
पद्मशाली समाज सुमारे सव्वाशे वर्षापासून येथे आल्यानंतर येथील इतर समाजांशी एकरूप होऊन राहत असे त्यानंतर समाजातील गुरुवर्य पोट्यन्ना पापाय्या बत्तीन यांनी सन १९१८ साली पंच कमिटी पद्मशाली ज्ञाती समाज संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फतच श्री मार्कंडेय मंदिराची व्यवस्था पाहिली जात व समाजातील इतर उत्सव साजरे करण्यास सुरुवात झाली. ते आजपर्यंत चालू आहे.
सुमारे सव्वाशे दीडशे वर्ष पद्मशाली विणकर फक्त फासगी व मिराणी असे दोनच वानांच्या साड्या तयार करीत होते बदलत्या काळा अनुसरून लोकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन अनेक वानांमध्ये त्यांनी बदल करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर विविध प्रकारचे अत्याधुनिक फॉशनचे साड्या अशी आकर्षक विणकामे या पद्मशाली समाजाच्या बांधवांकडून होऊ लागले व हा अहमदनगरचा माल महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्र बाहेरही लांबपर्यंत जाऊ लागला व अहमदनगर जिल्ह्यातील विणकामाचे महत्व वाढू लागले त्यानंतर व्यापारही वाढू लागला…
शब्दांकन व संकलन – कै. विठ्ठलराव नारायण मंगलारम यांच्या संग्रहातून…