नारळी पौर्णिमा निमित्त श्री. मार्कंडेय महामुनी पालखी सोहळा उत्साहात साजरी
अहमदनगर प्रतिनिधी

पद्मशाली समाज हा तेलंगणातून व्यवसाया निमित्त दिडशे ते दोनशे वर्षांपासून महाराष्ट्रातील विविध भागात, तसेच अहमदनगर शहरात स्थायिक झाला. समाजातील पंचांनी १८९६ मध्ये सरकारी लिलावात ३५० रुपयांमध्ये श्री मार्कंडेय मंदिराची जागा विकत घेतली. १९१७ मध्ये मंदिराचे बांधकाम सुरु झाले. मंदिरासाठी समाजातील प्रत्येक हातमाग कारखान दारांकडून प्रति हातमाग पाच रुपये अशी देणगी स्वीकारण्यात आली. श्री. नुती रामय्या हे या मंदिराचे पहिले पुजारी. त्यांच्या हस्ते १९२२ मध्ये मंदिरावर सुवर्ण कलश स्थापन करण्यात आला.
या मंदिरात श्री महादेव व श्री मार्कंडेय महामुनी यांची सुंदर व सुबक मूर्ती आहे. या मंदिरात वर्षभरात विविध धार्मिक व सामाजिक उत्सव साजरे करण्यात येतात.यात प्रामुख्याने श्री मार्कंडेय महामुनी जन्मोत्सव, महाशिवरात्री उत्सव, तसेच नारळी पौर्णिमा उत्सवाचा समावेश असतो. २०२२ मध्ये या मंदिराला शंभर वर्षे पूर्ण झाली.
आज नारळी पौर्णिमा निमित्त श्री. मार्कंडेय महामुनी पालखी सोहळया ची सुरुवात मार्कंडेय मंदिरा पासुन झाली.मार्कंडेय महामुनी यांच्या प्रतिमेचे पूजन मा. श्री.आमदार संग्राम भैय्या यांच्या हस्ते करण्यात आले.
पालखी चितळे रोड, दिल्लीगेट, तोफखाना या मार्गाने जात असताना जागोजागी पाणी, नाष्टा, वाटप करण्यात आले होते.
आजच्या मिरवणूकीचे खास आकर्षण FHD मातृशक्ती द्वारा शिव तांडव स्तोत्र ,तसेच मार्कंडेय शाळेतील विद्यार्थ्यांचे अप्रतिम लेझीम, सोहम स्पोर्ट्स ॲकॅडमी (ऑल इंडिया गोल्ड मेडल) यांचे मल्लखांब प्रात्यक्षिके, आकर्षक रांगोळी , आकर्षक डि जे अशा पध्दतीने श्री मार्कंडेय महामुनी पालखी मिरवणुक काढण्यात आली.
पंचकमेटी पद्मशाली ज्ञाती समाज श्री मार्कडेय मंदिर देवस्थान ट्रस्ट श्री श्रमिक बालाजी सामाजिक संस्था लक्ष्मीबाई कोटा आरोग्य केंद्र, श्रमिकनगर श्री पद्मशाली मार्कडेय दिंडी सोहळा श्री मार्कडेय नागरी सह. पतसंस्था जय शंकर नागरी सह पतसंस्था पद्मनादम ढोल-ताशा ध्वज पथक, अ.नगर. पद्मशाली विद्या प्रसारक मंडळ पद्मशाली पुरोहित संघम पद्मकन्या पुरस्कार समिती, अ.नगर श्री पद्मशाली समन्वय समिती स्त्री जन्माचे स्वागत उपक्रम, श्रमिकनगर समाजाचे सर्व सामाजिक संस्था मार्कंडेय साई सोशल वेलफेअर फाऊंडेशन. पद्मशाली स्नेहिता संघम पद्मशाली महिला शक्ती पद्मशाली, युवजन संघम साप्ताहिक मनपद्मशाली पद्मशाली, सोशल फौंडेशन महापद्मसेना , पद्मशाली युवा शक्ती सुमित इप्पलपेल्ली मित्र मंडळ, आदी मान्यवर उपस्थित होते..
त्या सोबत सर्व लहानांपासून ते वृध्दांपर्यंत चे लोक उपस्थित होते. आणि कार्यक्रमाचा आनंद घेत होते. मिरवणूकीचा शेवट परत मार्कंडेय मंदिरात झाला. त्या नंतर सर्व भाविकांना प्रसाद देण्यात आला.