ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय

AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल आयोजित मातृदिवस निमित्ताने कर्तृत्ववान आई सन्मान सोहळा 2025

अहिल्यानगर

कर्तृत्ववान विविध क्षेत्रातील आई चा सन्मान सोहळा..

आपल्या आईचा आपल्या आयुष्यावर प्रचंड मोठा प्रभाव असतो.पण जगण्याच्या धावपळीत आई बद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं राहून जातं. घरात सर्वांचे कौतुकाचे सोहळे होतात. मात्र आईचा कौतुक सोहळा होत नाही. खरं तर आईला कसलीही अपेक्षा नसते. आई ही आपल्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची गुरू असते.आई ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे भांडवल आहे.

आई या नात्याला वयोमर्यदा नसते.. ही आई 25 वर्षातली असो वा त्या पुढील… मग ती आई वर्किंग वुमन, हाऊसहोल्ड, बिझनेस वुमन कुठल्याही क्षेत्रातील असली तरी पण त्या आधी ती आई आहे..जी इतरांची काळजी घेते ती आई असते.आज त्या आई चा सन्मान सोहळ्यात तिच्या सोबत तिचे पती, मुल, मुली, सुना, नातवंड उपस्थित राहून तिचा आनंद द्विगुणित करणार आहेत.

या सन्मान सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातून जसे की अहिल्यानगर पुणे, मुंबई, संभाजीनगर, नांदेड,जळगाव,संगमनेर बाकी छोटी मोठी गाव, हैद्राबाद,अहमदाबाद अशा सगळीकडून कर्तृत्ववान आईंनी सहभाग नोंदविण्यात आला आहे.

हिच संकल्पना घेऊन मी AR न्यूज लेडीज चॅनेल तर्फे हा सोहळा आयोजित केला असून हा सन्मान सोहळा अहिल्यानगर मध्ये हाॅटेल V Star तारकपुर येथे येत्या दिनांक 3 मे शनिवारी दुपारी 11.30 ते 4 वाजेपर्यंत होणार आहे..

यात सन्मानार्थी आईंना AR न्युज लेडीज स्पेशल चॅनेल तर्फे मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, सर्टिफिकेट आणि जेवण असे देण्यात येणार आहेत..

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे