ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

दिल्लीगेट परिसरात दोन गटांत हाणामारी,वाहनांची तोडफोड

अहिल्यानगर

दिल्लीगेट परिसरातील म्युन्सिपल कॉलनीत गुरूवारी (24 जुलै) दुपारी दोन गटांत राडा झाला. यात महिलांसह तरूण जखमी झाले आहेत. पूर्ववैमनस्यातून हा वाद झाल्याचे सांगितले जात असून यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

गुरूवारी दुपारच्या सुमारास म्युन्सिपल कॉलनीत पवार-रोहकले हे दोन गट समोरासमोर आले. त्यांच्यात हाणामारीची घटना होऊन वाहनांची तोडफोड करण्यात आली. जमावाकडून दुकानावरही दगडफेक करण्यात आली. हाणामारीत दोन्ही गटांतील महिलांसह तरूण जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली.

जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दरम्यान, या वादातील काही लोकांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचाकडे तक्रार केली. यासंदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे