ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगरमध्ये २००. ५०० च्या बनावट नोटा लाखो रुपयांच्या बनावट नोटांसह तिघे जेरबंद

अहिल्यानगर

राहुरी पोलिस पथकाने शनिवारी मध्यरात्री शहर हद्दीत धडाकेबाज कारवाई केली. दोन लाख रुपयांच्या २०० व ५०० रुपयांच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या तीन आरोपींना पोलिस पथकाने सापळा लावून त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अहिल्यानगर येथून तीन इसम बनावट नोटा घेऊन मोटरसायकलवर राहुरीकडे येत आहेत अशी गुप्त खबर राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना दि.२८ जून रोजी रात्री ११ वाजे दरम्यान मिळाली. तेव्हा संजय ठेंगे यांनी ताबडतोब एक पोलिस पथक बरोबर घेऊन राहुरी शहरातील नगर – मनमाड रस्त्यावर गाडगे महाराज आश्रम शाळा परिसरात सापळा लावला. काही वेळाने तेथे मोटरसायकलवर तिन इसम आले.

तेव्हा पोलिस पथकाने त्यांना जागेवरच झडप घालून पकडले. पथकाने त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्या जवळ २ लाख रुपयांच्या २०० व ५०० रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. पथकाने मुद्देमाल जप्त करून आरोपींना गजाआड केले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे