ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर मध्ये लग्न समारंभातच तुफान हाणामाऱ्या, वऱ्हाडी लग्नमंडपातून थेट रुग्णालयात

अहिल्यानगर

राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रोड लगत असलेल्या एका कार्यालयात आज (दि.२९) रविवारी विवाह समारंभात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. वधू पक्षातील काही तरुणांनी वर पक्षातील तरुणांची येथेच्छा धुलाई केल्याने पाच ते सहा तरुणांना लग्नमंडपातून थेट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले.

वरपक्ष आणि वधू पक्षातील तरुणांत किरकोळ कारणातून जोरदार हाणामारी झाली. या कारणाने वर पक्षातील चार ते पाच तरुणांना लग्न मंडपातून थेट रूग्णालयात दाखल करावे लागले आहे.

राहुरी तालुक्यातील एका गावातील लग्न समारंभ राहुरी फॅक्टरी येथील एका कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. या लग्न समारंभात नगरवरून वऱ्हाडी आले होते. या लग्नाची मुलीकडच्या मंडळींकडून जोरदार तयारी सुरू होती. ठरल्याप्रमाणे रविवारी लग्न सोहळा पार पडला. मात्र यावेळी वधू पक्षातील तरुण आणि वर पक्षातील काही तरुण यांच्यात वाद झाला. सुरूवातीला हा वाद किरकोळ होता. नंतर या वादाचं रूपांतर हाणामाऱ्यात झाले.

लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र नगरहून आलेल्या वऱ्हाडातील तरुणांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे हा वाद चिघळला. हा वाद इतका वाढला की लग्न मंडपाला चक्क युद्धाच्या छावणीचं रूप आलं. शाब्दिक बाचाबाची थेट हाणामारी होईपर्यंत पुढे गेली.

वधू पक्षातील तरुणांनी वर पक्षातील काही तरुणांना लग्न मंडपातून थेट रुग्णालयात दाखल करे पर्यंत मारहाण केली. वर पक्षातील चार ते पाच जणांवर राहुरी फॅक्टरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे