ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाचे अहवाल प्रकाशन व जेष्ठ नागरीकांच्या विरूंगुळ्या साठी आणि वधुवर केंद्रासाठी महानगर पालिके कडून हाॅल उपलब्ध

सोलापूर

पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाची स्थापनेपासून विविध सामाजिक उपक्रम जसे विद्यार्थ्यांना वह्या वाटप,पूरग्रस्त अन्नधान्य वाटप, मेडिकल कॅंप, मतदार जनजागृती अभियान असे 48 विविध कार्यक्रमाचे चार वर्षाचे अहवाल प्रकाशन सोलापूरचे प्रथम नागरीक तथा महापौर विनायक कोंड्याल यांचे हस्ते नगरसेवक प्रथमेशदादा कोठे, नगरसेवक डाॅ.अजय पोन्नम, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम ,यंत्रमाग संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम,पद्मशाली शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष काशिनाथ गड्डम यांचे उपस्थितीत महापौरांच्या दालनात संपन्न झाले.

प्रथम संघाचे उपाध्यक्ष अनिल कन्ना यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून संघटनेचे विविध कार्यक्रमा ची माहिती दिली. त्यानंतर संघाच्या वतीने मान्यवरांचे शाल आणि बुके देऊन सत्कार करण्यांत आले. यावेळी नगरसेवक डाॅ अजय पोन्नम सर यांनी संघाचे कार्याचे कौतुक करून संघाचे निवेदना प्रमाणे वधु वर केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे मान्य केले.

नगरसेवक प्रथमेशदादा कोठे यांनी संघाचे कामकाज पाहून समाधान व्यक्त केले.युवकांपेक्षा सेवानिवृत्तांचे काम उत्तम असल्याचे सांगितले. संघासाठी व विरंगुळ्यासाठी जागा उपलब्ध होईल असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय महापौर विनायक दादा कोंड्याल यांनी आदरणीय आमदार देवेंद्र कोठे यांचे सहकार्य तसेच सर्व वरीष्ठ जेष्ठांचे आर्शिवादामुळे मला महापौर पदावर येऊन समाज सेवा करण्याची संधी मिळाली.

संघासाठी आॅफीस व वधु वर केंद्रासाठी तसेच विरंगुळ्या साठी जुन्या घरकूल मधील जागा उपलब्ध करून देत असल्याचे जाहीर केले. सदर प्रसंगी संघाचे अहवाल प्रकाशनही करण्यांत आले.

महापौर विनायक कोंड्याल अहवाल पाहून समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमांस संघाचे कार्याध्यक्ष सुरेश श्रीराम,अध्यक्ष श्रीहरी कुरापाटी, सहसचिव सत्यनारायण बरदेपूर,खजिनदार उमापती मिठ्ठापल्ली, कार्यकारी सदस्य अंबादास इंदापुरे, श्रीनिवास वल्लाकाटी,अनिलकुमार जन्यारम, संगीताताई इंदापुरे, अरूणा कन्ना , वरलक्ष्मी गोटीपामूल, प्रमिला वडीशेरला, सुरेखा गोली, नागनाथ संभारम, नागनाथ वड्डेपल्ली, शाम बेनगिरी, वैकुंठम जडल , लक्ष्मीकांत दंडी, विजयकुमार चाटला आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी देविदास मेरगू, किसन आडम,अविनाश संगा, सुखदेव सग्गम, अनिल गंजी,श्रीनिवास बोलाबत्तीन, आदीनी परीश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संघाचे उपाध्यक्ष अनिल कन्ना यांनी केले सचिव यशवंत इंदापुरे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे तसेच आदरणीय महापौर विनायक कोंड्याल,नगरसेवक प्रथमेश कोठे,नगरसेवक डाॅ.अजय पोन्नम यांचे संघास जागा उपलब्ध करून दिले बद्दल विशेष आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे