ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

गुलमोहर रोड येथील चैत्रबन कॉलनीमध्ये दोन घरांमध्ये झालेल्या चोरीच्या घटनांनंतर नगरसेवक योगीराज गाडे परिसराला भेट देऊन नागरिकांशी संवाद..

गुलमोहर रोड येथील चैत्रबन कॉलनीमध्ये दोन घरांमध्ये झालेल्या चोरीच्या घटनांनंतर संबंधित परिसराला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. तसेच काही दिवसांपूर्वी समता नगर येथे घडलेल्या चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तेथील नागरिकांचीही भेट घेत त्यांच्या समस्या व भावना जाणून घेतल्या.

यावेळी तोफखाना पोलीस ठाण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून परिसरात रात्रीच्या वेळेस नियमित व अधिक प्रभावी पोलीस गस्त वाढविण्याची तसेच या चोरीमागील आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करण्याची मागणी केली.

याचबरोबर सर्व नागरिकांना आवाहन केले की, घाबरून न जाता सतर्क राहा. आपल्या परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवा. नागरिकांचे सहकार्य आणि पोलिसांची तत्पर कारवाई यांच्या माध्यमातून अशा घटनांवर निश्चितच आळा घालता येईल.

आपल्या परिसराची सुरक्षा ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. – नगरसेवक योगीराज गाडे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे