ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पोटात वाढलेली आठ किलो वजनी गाठ काढण्यात यश – ठाणे पालिका रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाद्वारे शस्त्रक्रिया

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांनी २० वर्षीय तरुणीच्या पोटातील साडेआठ किलो वजनाची गाठ यशस्वीरीत्या बाहेर काढली. अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम यांनी ही माहिती दिली.

मूत्रपिंड, स्वादुपिंड व मोठ्या रक्तवाहिन्यांच्या अगदी लगत असलेल्या या गाठीमुळे शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने ती यशस्वी करून महापालिका रुग्णालयाच्या वैद्यकीय क्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती दिली.

गेले सहा महिने २० वर्षीय महिला पोटदुखी व पोटाला येणाऱ्या सुजेमुळे त्रस्त होती. उपचारांसाठी केल्या जाणाऱ्या तपासणीत तिच्या पोटाच्या डाव्या बाजूचा भाग ओटीपोटापासून उदरापर्यंत मोठ्या गाठीने व्यापल्याचे दिसून आले. सूक्ष्म तपासणीत सुमारे दीड फूट लांब व एक फूट रुंद आकाराची गाठ निदर्शनास आली.

गाठीचा इतर अवयवांवर थेट परिणाम झाला नव्हता. त्यानंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. सर्जरी विभागातील डॉ. वर्षा पाटील, डॉ. क्षितीज माने, डॉ. शुभम मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे