ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

साहित्यसंपदातर्फे अभंग लेखन स्पर्धा संपन्न

मुंबई

आषाढी वारीचे औचित्य साधून साहित्यसंपदा आयोजित राज्यस्तरीय अभंग लेखन स्पर्धा नुकतीच पार पडली.महाराष्ट्रातील विविध भागातून,स्तरांतून भरघोस प्रतिसाद या स्पर्धेस प्राप्त झाला.

साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे यांनी सहभागी स्पर्धकांचे आभार मानून निकाल जाहीर केला.

प्रथम क्रमांक -अरुण द. म्हात्रे, द्वितीय क्रमांक -अनिता गुजर, तृतीय क्रमांक -हेमा जाधव ,उत्तेजनार्थ -राजेश्वरी अंबिके, माधुरी इनामदार कै.शशिकांत पुराणिक स्मृती प्रित्यर्थ पुरस्काराचे मानकरी ठरले. कार्याध्यक्ष मयूर पालकर आणि कार्यवाहक वैशाली कदम यांनी कै.अनंत महादेव शेडे स्मृती प्रित्यर्थ पुरस्कार जाहीर केले.

प्रथम क्रमांक कविता झुंजारराव, द्वितीय क्रमांक सुचित्रा कुंचमवार, तृतीय क्रमांक चंदा वाडकर, उत्तेजनार्थ दीपा वणकुद्रे आणि करुणा शिंदे यांनी क्रमांक पटकावला.

अर्चना गोरे यांनी समन्वयक म्हणून भूमिका बजावली.स्पर्धेस लाभलेला प्रचंड प्रतिसाद लक्षात घेऊन आयोजकांतर्फे काही विशेष पारितोषिकांची घोषणा करण्यात आली त्या अंतर्गत कै.मनोहर नेवगी स्मृती प्रित्यर्थ प्रथम क्रमांक वर्षा वराडे फटकाळे, द्वितीय क्रमांक माधुरी बर्वे,तृतीय क्रमांक देवयानी म्हंकाळे आणि उत्तेजनार्थ क्रमांक अर्चना माने ,संध्या यावडकर यांनी पटकावला.

सर्व विजेत्यांना रोख रक्कम आणि डिजिटल सन्मानपत्र बहाल करण्यात आले.परीक्षक म्हणून अपेक्षा बिडकर आणि स्मिता पेशवे यांनी काम पाहताना स्पर्धकांच्या लेखन शैलीचे कौतुक केले. अशा स्पर्धेमुळे सृजनशील समाज निर्मितीस हातभार लाभेल असे मत व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे