ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर मधील धोकादायक इमारत कोसळली, ७२ वर्षीय महिलेला अग्निशमन दलाने दिले जीवदान..

“अथक प्रयत्न… धाडसी बचावकार्य…आणि अखेर सुखरूप जीवनदान..!”

अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील घर क्रमांक २५१७, संकलेचा बोळ, रासने वाडा, शहाजी रोड, नवीपेठ येथे पहाटे ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास धोकादायक इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली श्रीमती अरुणा नंदकुमार बागोडे (वय ७२ वर्षे) अडकल्या.

घटनेची माहिती मिळताच अहिल्यानगर महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्न, कौशल्य आणि धाडसाच्या जोरावर ढिगारा हटवत श्रीमती अरुणा बागोडे यांना जिवंत व सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले.

या बचावकार्यात कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनीही मोलाची मदत केली.

सध्या श्रीमती अरुणा बागोडे यांची प्रकृती व्यवस्थित असून, पुढील औषधोपचारासाठी त्यांना कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे