अहिल्यानगर डी-मार्टमध्ये स्वस्तात मिळताहेत ‘ह्या’ वस्तू ..कॉलेज आणि मान्सून स्पेशल ऑफर्सची धूम
अहिल्यानगर

अहिल्यानगर शहरातील लोकप्रिय सुपरमार्केट डी-मार्टने ‘स्टाईलमध्ये करा कॉलेजची सुरुवात’ आणि ‘मान्सून स्पेशल’ या आकर्षक ऑफर्सची घोषणा केली आहे. या अंतर्गत, कॉलेजच्या वस्तूंपासून ते किराणा आणि कपड्यांपर्यंत सर्व उत्पादनांवर किमान ६% सवलत दिली जात असून, अनेक वस्तूंवर ‘एक घ्या, एक मिळवा’ सारख्या बंपर ऑफर्सने ग्राहकांना आकर्षित केले आहे.
कॉलेज तरुणाईसाठी खास ऑफर्स
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर, डी-मार्टने कॉलेज तरुणाईसाठी खास ‘कॉलेज मर्चंडाईज’ विभाग सुरू केला आहे.स्टेशनरी ब्रँडेड लॉंगबुक्स आणि नोटबुक्सवर १५% ते ३५% पर्यंत सूट मिळत आहे. जेके कॉपियर पेपरचा ५०० शीट्सचा रिम ३५५ रुपयांऐवजी फक्त २७५ रुपयांना उपलब्ध आहे.
बॅग्ज आणि ॲक्सेसरीज: कॉलेज बॅग्ज २९९ रुपयांपासून, तर लॅपटॉप बॅग्ज ३९९ रुपयांपासून पुढे मिळत आहेत. स्टिल वॉटर बॉटल १४९ रुपयांपासून, तर सिस्का/झोबोनिक्सचे हेडफोन्स ७९९ रुपयांऐवजी फक्त ३९९ रुपयांना मिळत आहेत.
मान्सूनची तयारी डी-मार्टसोबत
पावसाळ्याची पूर्वतयारी करण्यासाठी डी-मार्टमध्ये ‘मान्सून स्पेशल’ विभाग सजला आहे.
रेनवेअर छत्र्या ३४९ रुपयांपासून, तर महिलांचे रेन सूट ४४९ रुपयांपासून उपलब्ध आहेत. स्टायलिश पाँन्चो फक्त १४९ रुपयांमध्ये मिळत आहे.
घरासाठी पावसाळ्यात घर स्वच्छ ठेवण्यासाठी स्पिन मॉप ७९९ रुपयांपासून पुढे उपलब्ध आहे.डी-मार्टने दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत.
‘एक घ्या, एक मिळवा’ ऑफर्स – लॉरियल टोटल रिपेअर शॅम्पू (६४० मि.ली.), मामाअर्थ राईस फेस वॉश (१५० मि.ली.), सनफिस्ट डार्क फँटसी चोको फिल्स (४७९.५ ग्रॅम) आणि चिंग्ज इन्स्टंट नूडल्स (२४० ग्रॅम) यांसारख्या उत्पादनांवर ‘बाय वन गेट वन फ्री’ ची धमाकेदार ऑफर आहे.
किराणा साखर ४२ रुपये किलो, तांदूळ ५५ रुपये किलो, तर गव्हाचे पीठ ३१.५० रुपये किलो दराने मिळत आहे. नटराज काजू (५०० ग्रॅम) ४४९ रुपयांना, तर टाटा टी (१ किलो) फक्त २२९ रुपयांना उपलब्ध आहे.
अपॅरल आणि फॅशनवर भरघोस सूट
डी-मार्टमध्ये महिला आणि पुरुषांच्या कपड्यांवरही खास ऑफर्स आहेत.
महिलांसाठी कॅज्युअल टॉप आणि एथनिक कुर्ता १९९ रुपयांपासून, तर लेडीज जीन्स आणि जेगिंग ३४९ रुपयांपासून उपलब्ध आहेत.
पुरुषांसाठी मेन्स कॅज्युअल आणि फॉर्मल शर्ट १९९ रुपयांपासून, तर जीन्स आणि फॉर्मल ट्राउझर ३४९ रुपयांपासून पुढे मिळत आहेत.
या ऑफर्समुळे अहिल्यानगरमधील ग्राहकांना कॉलेजच्या तयारीपासून ते दैनंदिन गरजांपर्यंत सर्व खरेदी एकाच छताखाली आणि कमी दरात करण्याची उत्तम संधी मिळाली आहे. अधिक माहितीसाठी ग्राहक डी-मार्ट स्टोअरला भेट देऊ शकतात.