
केंद्र शासनामार्फत चालविण्यात येणाऱ्या व सीबीएसई अभ्यासक्रम असलेल्या पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, टाकळी ढोकेश्चर येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२०२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
इयत्ता ६ वीमध्ये प्रवेशासाठी २९ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी केले आहे.प्रवेश प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार असून www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे.
यासाठी विद्यार्थी व पालक अहिल्यानगर जिल्ह्यातील असावेत. विद्यार्थ्याने इयत्ता ३ री ते ५ वी पर्यंत सलग शिक्षण घेतलेले असावे. जात प्रमाणपत्र विहित नमुन्यातील असावे. अर्जासोबत विद्यार्थ्याचे आधारकार्ड किंवा रहिवासी प्रमाणपत्र तसेच दोन छायाचित्रे आवश्यक आहेत. प्रवेशासाठीची परीक्षा १३ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहे.
प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी ९९६८२७०६८०, ९८८१४९८५९८ अथवा ८७८८९९६३७२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.