ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

राज्यातील ८३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. अहिल्यानगरचे अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरेंची नाशिकला बदली..

अहिल्यानगर

राज्यातील ८३ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. अहिल्यानगरचे अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांची नाशिक येथे महाराष्ट्र पोलिस अकॅडमीमध्ये बदली. श्रीरामपूर येथील अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्गे यांची अहिल्यानगरला अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती.

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाने शुक्रवारी (27 जून) जारी केले असून, त्यानुसार अहिल्यानगरचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांची बदली नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत अपर अधीक्षक पदावर झाली आहे. त्यांच्या जागी श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे यांची बदली करण्यात आली आहे.प्रशांत खैरे यांनी अहिल्यानगर येथे अडीच वर्षे कार्यरत राहत अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांची उकल करण्यासंदर्भात मार्गदर्शन करून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवले होते. त्यांच्या कार्यशैलीचे विविध ठिकाणी कौतुक झाले.

आता ते नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण अकादमीत नवीन जबाबदारी सांभाळणार आहेत.त्यांच्या जागी श्रीरामपूर येथील अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे हे अहिल्यानगर येथे रूजू होणार आहेत. मात्र, कलबुर्गे यांची बदली झाल्यामुळे श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षकपद सध्या रिक्त झाले आहे. लवकरच या पदासाठीही नवीन नियुक्ती अपेक्षित आहे.

दरम्यान, ठाणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांची बदली नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. तर नाशिक लाचलुचपत विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी कार्यरत असलेल्या शर्मिला घार्गे यांची बदली छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उप आयुक्तपदी करण्यात आली आहे. राज्य सरकारने शुक्रवारी केलेल्या बदल्या या 83 वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या असून, गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या बदल्यांवर यामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे