ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

श्री क्षेत्र आरडगांव ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा

अहिल्यानगर - संगीता खिलारी A R News प्रतिनिधी

सच्चिदानंद वै.सुखनिवासी श्री संत श्रीपादबाबा व श्री संत रामदास बाबा यांच्या कृपाशीर्वादाने तसेच ह.भ.प.सौ.योगिता महाराज शेळके यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व समस्त ग्रामस्थ आरडगाव भजनी मंडळाच्या सहकार्याने आरडगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

२५जून ते ०७जुलै २०२५ पर्यंत हा भक्तिमय पायी दिंडी सोहळा होत आहे. दिंडीचे १५ वे वर्ष असून सर्व गावकरी व भाविक भक्तांनी सहभागी होऊन दिंडीचे प्रस्थान झाले आहे.

आज सकाळी दरेवाडी फाटा वारकऱ्यांना नाश्ता व चहापान देऊन दिंडी पुढे मार्गस्थ करण्यात आली आहे.

यावेळी अनिल करांडे, गणेश तोडमल, अशोक सांगळे, संजय भिंगारदिवे,छोटू शिंदे,दत्तू बेरड, विजय बेरड,विजू उमाप,अमितबाबा बेरड,बाबा भिंगारदिवे,राजू सुर्यवंशी, गुलाब गवळी, बाळासाहेब राहिंज इत्यादी भाविक भक्त व वारकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे