ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

फटाका असोसिएशन ने केलेला सन्मान मला ऊर्जा देणारी – कैलास खरपूडे

अहमदनगर

होलसेल फटाका मार्केट च्या वतीने कैलास खरपूडे यांचा सन्मान.. 

नगर – कल्याण रोडवर अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनचे वतीने अहमदनगर जिल्हा नगरी सहकारी बँक असोसिएशन च्या तज्ञ संचालक पदी फटाका असोसिएशन चे माजी उपाध्यक्ष व भिंगार अर्बन बँकेचे जेष्ठ संचालक कैलास खरपूडे यांचा सन्मान फटाका असो. चे अध्यक्ष गजेंद्र राशीनकर व सचिव श्रीनिवास बोज्जा यांचे हस्ते करण्यात आले.

या वेळी उपाध्यक्ष सुरेश जाधव, सहसचिव अरविंद साठे कोषाध्यक्ष शिवराम भगत आदींसह सदस्य उपस्थित होते.

या वेळी सत्काराला उत्तर कैलास खरपूडे म्हणाले फटाका असोसिएशन चा माझा जुना ऋणानुबंध आहे. अनेक वर्षे मी फटाका व्यवसाय केलेला आहे व असोसिएशन चे पदाधिकारी म्हणूनही काम केलेले आहे. आज माझा जो सन्मान असोसिएशन ने केल्यामुळे माझी नक्कीच ऊर्जा वाढेल व या पुढे ही मी बँकेच्या मार्फत असोसिएशन च्या सदस्यांना व्यवसाय साठी योग्य ते सहकार्य करण्याचा प्रयत्न करेल.

या वेळी फटाका असोसिएशन चे श्रीनिवास बोज्जा यांनी कैलास खरपूडे यांच्या बाबत माहिती दिली.

अमोल तोडकर यांनी प्रास्ताविक केले, विकास पटवेकर यांनी आभार मानले. यावेळी फटाका व्यापारी असोसिएशन चे जेष्ठ सदस्य देवीदास ढवळे, संजय सुराणा, अमोल तोडकर, दाजी गारकर, संभाजी कराळे, विकास पटवेकर, विजय मुनोत, उमेश क्षीरसागर, अविनाश जिंदम, सागर हरबा आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे