ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

दिलखुलास गप्पामहाराष्ट्र

अहिल्यानगर मधील महिलांनी कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी केली.

अहिल्यानगर

बालपण देगा देवा 

मुंगी साखरेचा रवा !!!!

या उक्तीप्रमाणे कल्याणी नगरच्या महिलांनी कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरदाच्या चांदण्यात सर्वांनी भुलाबाई महोत्सव आनंदात साजरा केला . सर्व महिलांसाठी ही एक पर्वणीच होती. छान नटून-थटून टिपऱ्या घेऊन महिला ठीक सात वाजता अलका पितृभक्त यांच्याकडे जमल्या, येतांना सोबत खाऊचा डब्बा आणला.

सुरुवातीला गुलाबाईचे गाणे म्हटले पहिली ग गुलाबाई, सा बाई सू ,येथून राळा पेरत जाऊ, आरडी एवढं परडी ग, अशी विविध गाणी टिपरीच्या आणि टाळ्यांच्या तालावर नृत्यासह सादर केले.

महिलांना असे वाटत होते की खरोखर आपण अगदी लहान असताना गुलाबाईचा जो आनंद होता तसाच आनंद उपभोगला.

यादरम्यान स्पर्धेचे देखील आयोजन केले होते त्यात प्रथम द्वितीय तेजुकडे यांनी बक्षीस मिळवले नंतर चिठ्ठ्यांचा खेळ घेण्यात आला चिठ्ठीत जे लिहिले असेल ते कृती करणे या यात तर फारच गंमत आले चिठ्ठी उचलताना मनात कुतूहल निर्माण होत होते बाई ग !!!काय असेल? माझ्या चिठ्ठीत प्रत्येकीने चिठ्ठीचा खेळ खेळला आणि आनंद व्यक्त केला

नंतर गुलाबाई ची आरती करण्यात आली आणि मग खाऊ जिंकणे “गुलाबाई गुलाबाई खाऊच काय जिंकला नाही तर मिळणार नाय “असा गलका करत एकच हशा पिकला. प्रत्येकीला आपला खाऊ ओळखण्याची उत्सुकता लागली नंतर सर्व खाऊ जिंकून झाल्यावर एकत्र केला सोबत गरमागरम पाव वडा जिलेबी केशर दूध यांचा आस्वाद घेतला.

कार्यक्रमाचे नियोजन अलका गोविंद पितृभक्त यांनी केले होते कार्यक्रमात सुमन बाविस्कर ,रंजना शिंपी, राधा महाजन, छाया जाधव ,पुष्पा रसाळकर, सुमन गवळी, आणि सर्व कॉलनीतील महिला सहभागी झाल्या होत्या. असा आनंद पुन्हा मिळावा असे वक्तव्य करत सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.

गुलाबाई निमित्ताने एकत्रित आलो आणि आनंद द्विगुणित झाला असे धन्यवाद देत सगळ्या आपापल्या घरी पोहोचल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे