ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

नूतन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे ३ खात्यांची जबाबदारी..पण अर्थ खाते

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रानुसार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नूतन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना क्रीडा व युवक, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ ही तीन खाती दिली. मात्र, दिवंगत नेते अजित पवार यांच्याकडे असणारं अर्थ आणि नियोजन खातं सध्या सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेलं नाही. अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार आहे. येत्या 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करतील. पुढील काळात अर्थखातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहील अशी माहिती आहे.

सध्या सुनेत्रा पवार यांच्याकडे प्रशासकीय अनुभवाची कमतरता आहे. राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्च रोजी मांडला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असताना लगेच अनुभव नसताना खातं देणं जिकिरीचे असू शकतं.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्याकडे असलेल्या चार पैकी तीन खाती देण्यात आली आहेत. क्रीडा व युवक, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ ही खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे असतील. अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थखातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार आहे. म्हणजेच राज्याच्या 2026-27 चा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस सादर करतील, हे स्पष्ट झालं आहे.

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे