ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

भाजप नेत्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आज तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथून लातूरसाठी उड्डाण घेण्यापूर्वीच हा बिघाड वैमानिकाच्या लक्षात आला, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. पंकजा मुंडे या लातूरमध्ये प्रचारसभेसाठी जात होत्या.

मुंडे या सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज पंकजा मुंडे या लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रचार सभा घेणार आहेत. या प्रचारसभेचे अनेक ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.

या प्रचारसभेसाठी पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून हेलिकॉप्टरने लातूरकडे जाणार होत्या. पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने आकाशात झेपावणार इतक्यात त्यांच्या हेलिकॉप्टरचा तांत्रिक बिघाड असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ उड्डाण रद्द करण्यात आले.

यामुळे पंकजा मुंडे यांच्या लातूरमधील नियोजित सभांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी तातडीने दुसऱ्या हेलिकॉप्टरची व्यवस्था केली असून, त्या थोड्याच वेळात लातूरकडे रवाना होतील, अशी माहिती समोर येत आहे.

राष्ट्रवादी पक्षाअंतर्गत राजकारणामुळेच अजित पवार यांची मुख्यमंत्री पदाची संधी हुकली. नगरमधील माजी मंत्र्याचा खळबळजनक दावा

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे