ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

जलवाहिनी पुन्हा फुटली. नगर शहरात पाणी पुरवठा विस्कळीत

अहमदनगर

शहरातील पाणीपुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनी काल, सोमवारी नांदगाव (ता. नगर) शिवारात फुटली होती. ती दुरुस्त केल्यानंतर आज, मंगळवारी पुन्हा त्याच ठिकाणी फुटली आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगर भागास दोन दिवस उशिराने व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेने कळवले आहे.

काल मुख्य जलवाहिनी पाण्याच्या व हवेच्या दाबाने फुटली होती. दुरुस्तीचे काम पूर्ण करून पाणीउपसा व पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे नियोजन सुरू होते. मात्र, आज पुन्हा त्याच ठिकाणी जलवाहिनी तडा जाऊन फुटली. त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असले, तरी त्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे मुळानगर, विळद येथून होणारा पाणीउपसा बंद राहणार आहे.

परिणामी स्टेशन रस्ता परिसर, विनायकनगर, कायनेटिक चौक परिसर, आगरकर मळा या भागास पाणीपुरवठा झाला नाही.

या भागात आज, सोमवारी पाणीपुरवठा होईल. सिद्धार्थनगर, लालटाकी, तोफखाना, दिल्ली गेट, नालेगाव, चितळे रस्ता, आनंदी बाजार, कापड बाजार, ख्रिास्त गल्ली, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रस्ता परिसर, सावेडी, ढवणवस्ती, सारसनगर, बुरूडगाव रस्ता या भागास गुरुवारी (दि. ११) पाणीपुरवठा होईल, तर मंगल गेट, रामचंद्र खुंट, झेंडी गेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळ मंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौकी, माळीवाडा, कोठी या भागास व गुलमोहर रस्ता, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हिल हाडको, प्रेमदान हाडको, टीव्ही सेंटर परिसर, म्युनिसिपल हाडको भागास शुक्रवारी (दि. १२) पाणीपुरवठा होईल. वसंत टेकडी येथून पाणीपुरवठा होणाऱ्या मुकुंदनगर, सूर्यनगर, लक्ष्मीनगर, अर्बन बँक कॉलनी, केडगाव इंडस्ट्रीयल, अमितनगर, गायके मळा, पंचशीलवाडी या उपनगर भागास एक दिवस विलंबाने पाणीपुरवठा होईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे