ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

निलेश लंके मंगळवारी साधेपणाने अर्ज दाखल करणार 

अहमदनगर - जिल्हा प्रतिनिधी (संगीता खिलारी)

निलेश लंके हे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मंगळवार दि. २३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज साधेपणाने दाखल करणार आहेत. मतदारसंघातील आजी माजी आमदार, महाविकास आघाडीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

सन २०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीतही लंके यांनी शक्तीप्रदर्शन न करता अंध, अपंग, विधवा, परित्यक्त्यांच्या हस्ते आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तशाच पध्दतीने सन २०२४ च्या लोकसभा निवडणूकीतही लंके हे कोणतेही शक्तीप्रदर्शन करणार नाहीत.

गेल्या दोन वर्षांपासून लोकसभा निवडणूकीची तयारी करणाऱ्या आ. नीलेश लंके यांनी निवडणूक दृष्टीपथात आल्यानंतर शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून राणीताई लंके यांनी मतदारसंघातील गावागावांमध्ये जाऊन शिवविचार पोहचविण्याचा प्रयत्न केला. त्या निमित्ताने लंके हे घरोघर पोहचले. त्यापूर्वीही दिवाळी फराळाच्या निमित्ताने लंके यांनी मतदारंसघातील प्रत्येक गावच्या प्रमुुख कार्यकर्त्यांना हंगे येथे निमंत्रीत करून संवाद साधला होता. अलिकडेेच नगर शहरात शिवपुत्र संभाजी या खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या महानाटयाच्या प्रयोगाचे आयोजन करून लंके हे लाखो मतदारांपर्यंत पोहचले. महानाट्याच्या पहिल्या दिवसापासून या प्रयोगांना लाखो नागरीकांनी हजेरी लावल्याने हे महानाट्य कमालीचे यशस्वी ठरले. विशेष म्हणजे सर्वपक्षीय नेत्यांनी या महानाट्यास हजेरी लावली होती.

लंकेंनी शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कार्यकर्त्यांची मते जाणून घेत तांत्रीक अडचण नको म्हणून थेट आपल्या आमदारकीचा राजीनामा पक्षाकडे सुपूर्द करून लंके हे मैदानात उतरले आहेत. स्वाभीमान जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने पुन्हा ते मतदारसंघातील गावागावांमध्ये पोहचलेत. लंके यांची ही जनसंवाद यात्राही कमालीची यशस्वी झाली. रात्री दहा वाजता यात्रेचा समारोप अपेक्षीत असताना लंके हे पहाटे तीन वाजेपर्यंत गावागावांना भेटी देत होते. उशिरापर्यंत नागरीक लंके यांची वाट पाहत असल्याचे चित्र गावोगावी दिसून येत होते.

स्वतः शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यासह जिल्हयातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नगर शहरात या यात्रेचा समारोप झाला. या सांगता सभेलाही मोठा प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील नेते एकसंघपणे लंके यांच्या पाठीशी असल्याचा संदेश या सांगता सभेतून देेेेण्यात लंके हे यशस्वी झाले. या पार्श्‍वभुमीवर लंके हे आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल करणार आहेत.

अर्ज भरण्यापूर्वीच लंके संपूर्ण मतदार संघातील घराघरात पोहचले.

निवडणूक जाहिर झाल्यानंतर काढलेल्या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने लंके घरोघर पोहचले आहेत. लंके यांचे सहकारीही गावागावांमध्ये तळ ठोकून असून ते मतदारांपर्यंत पोहचत आहेत.

अर्ज दाखल करण्यापूर्वीच लंके हे घराघरापर्यंत पोहचले असून प्रत्यक्ष निवडणूक सुरू झाल्यानंतर विविध सभांच्या माध्यमातून लंके हे जबरदस्त वातावरण तयार करून यशस्वी बाजी मारतील अशी सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चा सुरू आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे