श्री मार्कंडेय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय श्रमिकनगर आज समर कॅम्प ला सुरुवात
अहमदनगर

श्री मार्कंडेय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय श्रमिकनगर या ठिकाणी आज समर कॅम्प ला सुरुवात झाली .सोसायटीचे चेअरमन विलास सग्गम साहेब हे कार्यक्रमाचे उद्घाटक होते.
त्याचप्रमाणे पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. बाळकृष्ण सिद्धम सर ,विश्वस्त राजेंद्र म्याना साहेब त्याचप्रमाणे समर कॅम्प मध्ये विशेष सहभाग असणारे राष्ट्रीय सेवा दलाचे अरुण आहेर सर, विवेक पवार साहेब , बापू जोशी साहेब ,दिकोंडा साहेब हे याप्रसंगी उपस्थित होते..
समर कॅम्प सकाळी आठ वाजता सुरुवात झाली सुरुवातीस हार्टफुलनेस या ग्रुपचे डॉक्टर उदमले सर व त्यांचे सर्व सहकारी त्याचप्रमाणे गाली मॅडम, ठाकरे मॅडम यांनी मेडिटेशन घेतले. त्यानंतर ओमकार ,योगासन, प्रार्थना घेण्यात आली .आज हस्तकला या विषयावरती हस्तकलाचे सुपरिचित असणाऱ्या प्रशिक्षक सौ स्मिता म्याना मॅडम व श्री गणेश गुडा सर कुमारी प्रतिमा कोडम यांनी घोटीव कागदापासून विविध स्वरूपाच्या आकर्षक वस्तू तयार केल्या त्याचप्रमाणे टाकाऊ वस्तुपासून टिकाऊ वस्तू कशा करायच्या या संदर्भामध्ये मुलांना मार्गदर्शन केले या कॅम्पमध्ये विविध शाळेतील जवळपास 80 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे.
सदरील समर कॅम्प या उपक्रमास सर्व मान्यवरांनी भाषणातून शुभेच्छा देऊन स्तुती सुमने उधळली.