ब्रेकिंगमहाराष्ट्र
अहमदनगर जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी रमजान पठाण यांचे निधन
श्रीरामपूर (प्रतिनिधी)

शिक्षण विस्तार अधिकारी रमजान पठाण अभ्यासू व्यक्तिमत्व होते – आमदार कानडे
अहमदनगर जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तथा श्रीरामपूर नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी,शिक्षक बँकेचे माजी संचालक रमजान पठाण एक अभ्यासू व्यक्तिमत्व होते प्रत्येक प्रश्नांची सोडवणूक करण्याचे तंत्र त्यांना अवगत होते.संच मान्यतेमध्ये त्यांचा हातखंडा होता.
सीओपासून शिपायापर्यंत सर्व त्यांचे मित्र होते त्यांनी आपल्या स्वभावाने फक्त मित्र जोडले. जिल्हा परिषदेमध्ये आम्ही एकत्र काम केले.त्यांच्या अचानक जाण्यामुळे शिक्षण विभागामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे असे प्रतिपादन तालुक्याचे आमदार लहू कानडे यांनी केले.
ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तथा प्रशासन अधिकारी रमजान पठाण यांचे अल्पशा आजाराने शनिवारी रात्री आठ वाजता दुःखद निधन झाले.ते 55 वर्षाचे होते.