महाराष्ट्रसंपादकीय
AR Digital Media & AR online News Portal च्या माध्यमातून सादर करीत आहे आयुर्वेद विषयी ची पुस्तिका
अहमदनगर - आयुर्वेद तथ्य आणि कथ्य'

आयुर्वेद तथ्य आणि कथ्य’स्वातंत्र्यदिना निमित्ताने अस्सल भारतीय आयुर्वेद ज्ञानाविषयी विशेष पुस्तिका डॉ. रत्ना बल्लाळ आणि डॉ. सगुणा ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित करत आहोत.
आपल्या या पुरातन शास्त्राविषयी आपल्याच मनात बरेच समज गैरसमज आहेत. काही ऐकीव माहितीच्या आधारे आपण या शास्त्राविषयी उगाच भिती बाळगून आहोत का ? पथ्याविषयी बाऊ करतो का ? याच सगळ्याचा मागोवा या पुस्तिकेत घेतला आहे.
प्रकाशन सोहळा १५ ऑगस्ट रोजी, आयुर्वेद व्यासपीठ, धर्माधिकारी मळा अहमदनगर येथे ठीक ३.३० ते ५.३० या वेळात आयोजित केला आहे. कार्यक्रम वेळेवर सुरू होईल याची नोंद घ्यावी.
आमच्या आगामी इतर पुस्तिकांविषयी जाणून घेण्यासाठी आपणांस हे आग्रहाचे निमंत्रण !
आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.