ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

आधार व पॅनकार्डचा गैरवापर ,5 लाखांची फसवणूक

अहिल्यानगर

उल्हासनगर येथील एका इसमाने राहुरी तालुक्यातील मालुंजे येथील नितीश पवार यांचे आधारकार्ड व पॅनकार्ड चा गैरवापर करून वेगवेगळ्या बँका व फायनान्स कंपन्यां कडून सुमारे 5 लाख रुपये कर्ज काढून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. नितीश दादासाहेब पवार (वय 29) हे राहुरी तालुक्यातील मालुंजे खुर्द येथे राहत आहेत. त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, नितीश पवार यांना मोटारसायकल घ्यायची असल्याने त्यांनी दि. 9 सप्टेंबर 2024 रोजी श्रीरामपूर येथील आयडीएफसी बँक येथे कर्ज घेण्यासाठी अर्ज केला. त्यावेळी तेथील बँक अधिकारी यांनी नितीश पवार यांचे सीबील चेक केले असता नितीश पवार यांचे आधारकार्ड व पॅनकार्डचा गैरवापर करून उल्हासनगर येथील मनिष पालवे याने नितीश पवार यांच्याबरोबर जॉईंट खाते उघडले आणि त्यांच्या नावावर विविध बँका, फायनान्स कंपनीचे एकूण 4 लाख 45 हजार 76 रुपये कर्ज घेतले. त्या कर्जाचे हफ्ते भरलेले असून त्यापैकी 2 लाख 29 हजार 870 रुपये कर्ज भरणे बाकी आहे, असे समजले. त्यामुळे तुमचे कर्ज प्रकरण होणार नाही. असे बँक अधिकार्‍यांनी नितीश पवार यांना सांगितले.

आपण कोणत्याही बँकेचे कर्ज घेतले नसून उल्हासनगर येथील एका भामट्याने आपले आधारकार्ड व पॅनकार्डचा गैरवापर करून कर्ज काढले आहे. असे समजल्यावर नितीश दादासाहेब पवार यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मनिष अनिल पालव, रा. बिल्डींग नंबर 1416, रुम नंबर 01, स्टेशन रोड, नियर शिवधाम अपार्टमेंट महाराष्ट्र, सेक्शन 32, उल्हासनगर, याच्यावर गु.र.न. 13/2025 भारतीय न्याय संहिता कलम 318 (4), 336 (3), 340 (1), 340 (2) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पो. नि. संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूआहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे