ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

खा. सुजय विखे पाटील यांच्याकडून अहमदनगर शहरास १ कोटी ४० लक्ष रुपयांचा भरीव निधी

अहमदनगर

खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून अहमदनगर शहरातील विकास कामांकरिता भरघोस निधी प्राप्त झाला आहे.

शहरातील विविध प्रभागांमध्ये खासदार निधीतून ९० लक्ष आणि पर्यटन विकासमधून ५० लक्ष असा एकूण १ कोटी ४० लक्ष रुपयांचा भरीव निधी विविध ठिकाणी सभामंडपाच्या बांधकामांसाठी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

खासदार निधीतून प्रभाग क्र.२ येथील वैष्णवी माता मंदिर, प्रभाग क्र.७ मधील विजयनगर येथे मारुती मंदिर परिसर, प्रभाग क्र. ८ मध्ये दातरंगे मळा येथील पर्जन ईश्वर महादेव मंदिर परिसर, प्रभाग क्र.५ मध्ये समता चौक येथील हनुमान मंदिर व महादेव मंदिर परिसर, प्रभाग क्र. ९ मध्ये सिद्धी बागेतील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसर, प्रभाग क्र. १६ मध्ये शिवाजीनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, प्रभाग क्र. १६ मध्ये ओंकार नगर येथील हनुमान मंदिर, प्रभाग क्र. १६ मध्ये विश्वनराजे मराठा मंदिर, प्रभाग क्र.१७ मध्ये शास्त्रीनगर येथील श्री दत्त मंदिर, प्रभाग क्र. १७ मध्ये मोहिनीनगर येथील श्री गणपती मंदिर आदी ठिकाणी आणि पर्यटन विकासमधून प्रभाग क्र.१६ मध्ये बालाजी कॉलनी येथील श्री स्वामी समर्थ मंदिर,प्रभाग क्र. १६ मध्ये पाच गोडाऊन येथील दत्त मंदिर, प्रभाग क्र.१७ मध्ये एकता कॉलनी देवी रोड येथील गणपती मंदिर, प्रभाग क्र. १७ मध्ये मोहिनी नगर पाण्याची टाकी येथील हनुमान मंदिर, प्रभाग क्र. १७ मध्ये शास्त्रीनगर येथील हनुमान मंदिर आदी ठिकाणी सभामंडप बांधकाम करण्यासाठी सदरील निधी मंजूर झाला आहे.

विखे यांनी एक लोकप्रतिनिधी या नात्याने विविध विकासकामांसाठी सदैव कटिबध्द असून यापुढेही अशा अनेकविध कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील भूमिका पार पाडणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी जिल्हा शहराध्यक्ष अभय आगरकर, नगर दक्षिण लोकसभा प्रमुख बाबासाहेब वाकळे, अहमदनगर विधानसभा निवडणूक प्रमुख भैया गंधे, युवा मोर्चाध्यक्ष मयूर बोचुघोळ, महिला शहराध्यक्ष प्रिया जानवे, ओबीसी सेल अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, प्रदेश कार्यकारणी सदस्य विवेक नाईक व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे