ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंग

लिंकव्दारे बँक खात्यातून अडीच लाख लांबविले, शिवाजी कर्डिले यांनी नगर तालुका पोलिसात गुन्हा

अहमदनगर

अहमदनगर-सायबर फसवणूकीत वाढ झाली असून एखाद्या व्यक्तीला आलेला फेक कॉल त्याचे पूर्ण खाते रिकामे करतो. अशीच एक घटना नगर तालुक्यात घडली आहे.

एका अनोळखी व्यक्तीने आयसीआय बँकेतून बोलतो, तुमचा ऑनलाईन प्रॉब्लेम आहे, असे सांगून एकाच्या बँक खात्यातून दोन लाख 61 हजार 648 रूपयांची रक्कम काढून घेत फसवणूक केली. शिवाजी भिकाजी (वय 43 रा. जखणगाव ता. नगर) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना दि. 13 रोजी दुपारी तीनच्या सुमारास घडली.

याप्रकरणी कर्डिले यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एका मोबाईल नंबर धारक व्यक्ती विरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनोळखी व्यक्तीने एका मोबाईल नंबरवरून फोन करून आयसीआय बँकेतून बोलत असल्याचे कर्डिले यांना सांगितले. तुमचा ऑनलाईन प्रॉब्लेम आहे.

आजच क्लिअर करावा लागेल, असेही सांगून कर्डिले यांचा विश्‍वास संपादन केला. त्यांच्या व्हॉट्सअप नंबरवर एक लिंक पाठवून कर्डिले यांच्या डेबीट कार्डचा फोटो घेतला.

लिंकमधून कर्डिले यांची गोपनीय माहिती घेत त्यांच्या बँक खात्यातून 97 हजार 800, 99 हजार 850, 14 हजार 999, 23 हजार 999 आणि 25 हजार अशी रक्कम काढून फसवणूक केली. फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्याने अधिक सुपा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे