ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने वार

पुणे

एकतर्फी प्रेमातून सदाशिव पेठेत पेरूगेट पोलिस चौकीजवळ सकाळच्या वेळी तरुणीवर कोयत्याने वार करणाऱ्या आरोपीला सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी जामीन मंजूर केला. शंतनू लक्ष्मण जाधव (वय २१, रा. डोंगरगाव, ता. मुळशी) असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे.

जाधव याने २७ जून २०२३ रोजी सदाशिव पेठेत सकाळी दहाच्या सुमारास तरुणीवर कोयत्याने वार केले होते. त्या वेळी काही तरुणांनी आरोपी जाधवला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पीडित २० वर्षीय तरुणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून जाधवच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून जाधव कोठडीत होता.

जाधवने ॲड. अभिषेक हरगणे, ॲड. स्वप्नील चव्हाण, ॲड. ओंकार फडतरे यांच्यामार्फत जामीन मिळवण्यासाठी अर्ज सादर केला होता. कारागृहातून जामीन मिळवून बाहेर पडल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी बोलाविल्यानंतर उपस्थित राहणे, पासपोर्ट जमा करणे या अटींवर जाधव याचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला.

दरम्यान, सदाशिव पेठेत झालेल्या या हल्ल्याची राज्यभरात मोठी चर्चा झाली होती. हल्लेखोर हा तरुणीच्या मागे धावत असताना तेथे उपस्थित असलेल्या तरुणांनी दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. तसंच तरुणीचा जीव वाचवणाऱ्या या तरुणांवर नंतर अनेक राजकीय नेत्यांसह सामाजिक संस्थांनी बक्षीसांचा वर्षाव केला होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे