ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

राहाता कृषी बाजार समितीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुल खरेदी -विक्री केंद्र उभारणार-राधाकृष्ण विखे-पाटील

राहाता कृषी बाजार समितीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘फुल खरेदी -विक्री केंद्र’ उभारणार असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केले. या बाजार समितीच्या विस्तारासाठी शासनाकडून 9 हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे. शेती मालाच्या निर्यातीसाठी शिर्डी विमानतळावर कार्गो हब निर्माण केले जाईल असेही मंत्री विखे पाटील यांनी नमूद केले.

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस  मंत्री विखे-पाटील यांची उपस्थिती हाेती. या बाजार समितीला जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल संचालक मंडळाने विखे पाटील यांचा सत्कार केला. त्यावेळी विखे-पाटील यांनी शेतकरी सभासदांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले.

महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले राज्य सरकारच्या वतीने राहाता बाजार समितीला शेती महामंडळाची 9 हेक्टर जमिन हस्तांतरित करण्यात आली आहे. या जागेत आंतरराष्ट्रीय फुल खरेदी – विक्री केंद्र उभारले जाईल.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे