
नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गौतमी पाटीलसह चार जणांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळतेय.
जून महिन्यात बंद झालेले गौतमी पाटीलचे कार्यक्रम दहीहंडीनंतर पुन्हा सुरु झाले आहेत. गणपती उत्सवामध्ये अनेक ठिकाणी गौतमीच्या नाचगाण्यांचे कार्यक्रम झाले. अशाच एका गणपती उत्सवात गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. परंतु तिच्यासह चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
अहमदनगर मधील एका गणपती उत्सवामध्ये रस्त्यावरच गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमासाठी परवानगी घेतली गेली नव्हती. त्यामुळे गौतमी पाटील, तिचा मॅनेजर आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या पूर्वीदेखील गौतमी पाटीलवर सोलापूरमध्ये गुन्हा दाखल झालेला होता. विरारमध्येही तिच्या कार्यक्रमावरुन मोठा वाद झालेला. जिथं जिथं गौतमीचे कार्यक्रम होतात तिथं हुल्लडबाजीचे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलिस तिच्या कार्यक्रमांना परवानगी देत नाहीत. नगरमध्ये विनापरवाना रस्त्यावर कार्यक्रम घेतल्याप्रकरणी गौतमीसह चौघांवर गुन्हा दाखल झालाय.