ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

लव जिहादचा कायदा आणणे ही काळाची गरज – खा. सुजय विखे

अहमदनगर प्रतिनिधी

हिंदू माता भगिनीं वरील होत असलेले अत्याचार लक्षात घेता लव जिहादचा कायदा आणणे ही काळाची गरज असून अशा ‘जन आक्रोश मोर्चातून याचीच मागणी होत असल्याचे खा. डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

राहुरी येथे सकल हिंदू समाज संघटनेच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले की, संसदेचे सध्या अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात अविश्‍वासाच्या ठराव प्रसंगी बोलताना लव जिहादच्या कायद्याविषयी आपण निवेदन करणार असून, अलीकडच्या काळात अशा घटना दुर्दैवाने वाढत आहेत.

कोणतेही सरकार अशा घटना घडाव्यात, यासाठी काम करत नसते मात्र सरकार अशा समस्या समूळ नष्ट करण्यासाठी कायद्याच्या माध्यमातून त्यावर उपाय काढते. नगर जिल्ह्यात अलीकडच्या काळात अशा प्रकारच्या दोन, तीन घटना घडल्या असून पोलीस प्रशासनास वेळोवेळी कडक शब्दात सूचना आपण केल्या.

असल्याचे सांगताना खा.विखे म्हणाले की, जिल्ह्यातील माता, भगिनींच्या पाठीशी हा भाऊ सदैव असून त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही आणि हाच विश्‍वास देण्यासाठी या मोर्चात आपण सहभागी झालो आहोत, असे सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे