ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

अहिल्यानगर मधील फ्लॅट खरेदीसाठी बुकिंग करून घेतलेली रक्कमेची 13 लाख 92 हजार 625 लाखांची फसवणूक

अहिल्यानगर

अहिल्यानगर मधील फ्लॅट खरेदीसाठी बुकिंग करून घेतलेली 13 लाख 92 हजार 625 रुपयांची अग्रीम रक्कम परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी निवृत्त कर्नलच्या फिर्यादीवरून कॅम्प पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे, बेळगाव आणि अहिल्यानगर येथील आरोपींचा यामध्ये समावेश आहे. हा प्रकार नगर-सोलापूर रोडवरील दरेवाडी परिसरात घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी भोम दुबे (वय 65, रा. सारसनगर) यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सतीश वामन गिरी (रा. लोटस रेसिडेन्सी, संगम प्रेससमोर, कोथरूड, पुणे), दिलीप प्रेमराज चंडक (रा. मिरा मेहल, फर्स्ट क्रॉस रोड, आदर्शनगर, बेळगाव), सुशिल हनुमानदास सारडा (रा. सारडा लेन, अहिल्यानगर) आणि सुयश रविंद्र लुणावत (रा. कस्तुर कुंज, आयसीएस कॉलनी, भोसलेनगर, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी एल.एस. व्ही.एस. डेव्हलपर्स या कंपनीच्या माध्यमातून फिर्यादीला फ्लॅट खरेदी करण्याबाबत व्यवहार केला.

फ्लॅट खरेदीसाठी फिर्यादीकडून एकूण 13 लाख 92 हजार 625 रुपये अग्रीम रक्कम घेऊन बुकिंग करण्यात आले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे सदर रक्कम परत करण्यात आली नाही, असा आरोप फिर्यादीने केला आहे.

फ्लॅटच्या व्यवहारासाठी रक्कम स्वीकारल्यानंतर ती परत न करता आरोपींनी फिर्यादीचा विश्वासघात केला आणि स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात चौघांची भूमिका काय होती, तसेच घेतलेली रक्कम नेमकी कोणत्या कारणासाठी वापरण्यात आली, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. हा व्यवहार 13 मे 2013 ते 18 सप्टेंबर 2026 या कालावधीत नगर-सोलापूर रोडवरील दरेवाडी परिसरात झाल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे