धातूची मूर्ती..प्रदूषणापासून कायमची मुक्ती. यावर आधारित पंचधातूच्या श्री गणेशास पर्यावरण पूरक पद्धतीने गणरायाला निरोप
तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर

बालपण स्कूल पानोडीच्या विद्यार्थ्यांनी परिसरातील नागरिकांना पर्यावरण पूरक पद्धतीने गणेश विसर्जनाचे प्रतिज्ञेतून केले आवाहन….

बालपण स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पानोडी तालुका संगमनेर या शाळेने पंचधातूच्या श्री गणेशाची स्थापना करून व ज्ञानरूपी पुस्तकांचा देखावा सादर करून चिमुकल्यांनी आज आपल्या ज्ञानरूपी व पंचधातूच्या श्री गणेशास निरोप देत शाळेच्या आवारातील झाडाजवळ पंचधातूच्या गणेशास दुग्धाभिषेक करत व शाळेच्या आवारातच गणेशाचे विसर्जन करत पर्यावरण संवर्धनाचे बहुमूल्य असे कार्य केले. बालपण स्कूलच्या चिमुकल्यांनी गणेशाच्या स्थापनेपासून विसर्जनापर्यंत दररोज ज्ञानरूपी विविध उपक्रम राबवत अतिशय आनंद उत्सव वातावरणात यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पानाफुलांच्या गणेशाचे प्रदर्शन, गणेशाच्या रांगोळीचे प्रदर्शन, विद्यार्थ्यांनी प्राचीन वस्तू व भांडे यांचे प्रदर्शन, विद्यार्थ्यांनी गावरान बियाणे आणून त्याचे गणेशा समोर प्रदर्शन तसेच अष्टविनायकाचे आठ गणेशाचे विद्यार्थ्यांमार्फत सुंदर असे विश्लेषण करत तसेच दररोज गणेशासमोर वाचन व लेखन उपक्रम श्री गणेशाचा उत्सव आठवडाभर अतिशय उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यात आला.



आज चिमुकल्यांनी शाळेच्या आवारातील पानाफुलांपासून रस्ता सजून गणेशाची मिरवणूक काढत व झाडाच्या खोडाजवळ दुग्धाभिषेक करत तसेच गणेश विसर्जनाची प्रतिज्ञा करत प्रतिज्ञेतून सर्व गणेश मंडळांना परिसरातील नागरिकांना या प्रतिज्ञेतून प्रत्येकाने नदीपात्रात तलावात विहिरीत गणेशाचे विसर्जन न करता आपल्या घरासमोरच कृत्रिम रित्या विसर्जन करावे व यातून नदीपात्रातील पाणी दूषित होणार नाही व पर्यावरण रक्षणास हातभार लागेल याची काळजी घ्यावी असे आवाहन केले .

या उपक्रमासाठी बालपण स्कूलचे प्राथमिक विभाग पूर्व प्राथमिक विभाग माध्यमिक विभाग व उच्च माध्यम विभाग अशा सर्व विभागाच्या शिक्षकांनी उत्तम असे नियोजन करत पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला.




