नांगरे-पाटलांच्या अधिसूचनेची कडक अंमलबजावणी करा, एकट्या नागपूरमध्ये नव्हे संपूर्ण विदर्भात DJ वर निर्बंध

नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी डीजे निर्बंधावरील काढलेल्या अधिसूचनेची पोलिसांनी कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहे.
दहीहंडी आणि मारबत उत्सवात नागपुरात डीजेच्या दणदणाटाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून गंभीर दखल घेतली असून नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी डीजे निर्बंधावरील काढलेल्या अधिसूचनेची पोलिसांनी कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश खंडपीठाने दिले आहे.
अधिसूचना काढल्यावरही दहीहंडी आणि मारबत मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात डीजे वाजवण्यात आल्याचे व्हिडीओ पुरावे याचिकाकर्त्यांनी कोर्टासमोर सादर केले होते. ध्वनी प्रदूषणाच्या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात त्रिमूर्तीनगर मंडळाच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, कोर्टात सादर करण्यात आलेल्या बातम्या तसेच व्हिडिओच्या आधारावर संबंधित आयोजका विरोधात योग्य कारवाई करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. तर नागपूरसह विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये डीजेवरील निर्बंधांचे आदेश लागू करण्याचा सूचना ही कोर्टाने दिल्या आहे.
डीजे बंदी किंवा ध्वनी प्रदूषणाच्या नियमानबाबत केवळ अधिसूचना काढणे पुरेसे नाही, तर त्या नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही, हे निश्चित करणे ही कर्तव्य असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. तर नागपूरसह विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये डीजेवरील निर्बंधांचे आदेश लागू करण्याचा सूचना ही कोर्टाने दिल्या आहे.
याप्रकरणी पोलीस आयुक्तांना 22 सप्टेंबरपर्यंत कोर्टात शपथपत्र दाखल करून कारवाईची माहिती सादर करण्याचे निर्देश ही देण्यात आले आहे.




