ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

धीरज परदेशींचा मृत्यू, कापड बाजार परिसरात तणाव…

अहिल्यानगर

अहिल्यानगरच्या मुकुंदनगर परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेले महापालिकेच्या कंत्राटी संस्थेचे कर्मचारी धीरज कचरुसिंग परदेशी यांचे उपचारादरम्यान निधन झाले.

पथदिव्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना १० ते १५ जणांच्या टोळक्याने लोखंडी दांडक्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या घटनेप्रकरणी महापालिकेतील वायरमन युनूस शेख याच्यासह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

धीरज परदेशी यांच्या निधनाची बातमी समोर येताच रुग्णालयाबाहेर नातेवाईक, नागरिक आणि समर्थकांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय? तपासातून आता काय समोर येतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे