ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

सावेडी उपनगरातील मिस्किनमळा परिसरात 30 ते 32 लाख रुपये किमतीचे 150 ते 160 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त

अहिल्यानगर

अहिल्यानगर  मधील सावेडी उपनगरातील मिस्किनमळा परिसरात तोफखाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने रविवारी (19 जुलै) धडक कारवाई करत सुमारे 30 ते 32 लाख रुपये किमतीचे 150 ते 160 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. या कारवाईत संशयास्पद विनाक्रमांकाच्या स्विफ्ट कारसह तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, वाहनातील अन्य दोघे संशयित पसार झाले आहेत.

जिल्ह्यात एकाच कारवाईत एवढ्या मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन जप्त होण्याची ही पहिलीच मोठी घटना मानली जात असून, त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

तोफखाना पोलिसांचे गुन्हे शोध पथक मिस्किनमळा परिसरात गस्त घालत असताना विनाक्रमांकाची स्विफ्ट कार संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने वेग वाढवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून वाहन अडविले.

कारवाईची चाहूल लागताच वाहनातील दोघे जण पसार झाले. तर झिशान शौकत सय्यद, रेहान जावेद शेख आणि वसीम खलील बागवान या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर वाहनाची कसून झडती घेतली असता 150 ते 160 ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ आढळून आला. तसेच पिस्तुलासारखे दिसणारे एक लायटर, एक एअर गन, मास्क, कटावणी आणि दरोडा टाकण्यासाठी वापरले जाणारे अन्य साहित्यही पोलिसांनी जप्त केले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तोफखाना पोलिसांनी तातडीने फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले. प्राथमिक तपासणीत जप्त केलेला पदार्थ मेफेड्रोन असल्याचे स्पष्ट झाले असून, त्याची काळ्या बाजारातील किंमत सुमारे 30 ते 32 लाख रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणात वसीम खलील बागवान (वय 38, रा. पिंजर गल्ली, चाचा मेससमोर), झिशान शौकत सय्यद (वय 27, रा. सहारा कॉलनी, मुकुंदनगर) आणि रेहान जावेद शेख (वय 24, रा. छोटी मशीद, मुकुंदनगर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तर जमीर भाई आणि एक अनोळखी इसम पसार असून, त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

अमली पदार्थांचा पुरवठा कोणत्या रॅकेटमार्फत होत होता, जप्त साहित्याचा नेमका वापर कशासाठी होणार होता आणि पसार आरोपींची भूमिका काय आहे, याचा तपास तोफखाना पोलिसांकडून सुरू आहे.

 

 

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे