ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्र

अहमदनगर मर्चंटस् को- ऑप बॅंकेच्या चेअरमनपदी संजय चोपडा यांची बिनविरोध निवड

अहिल्यानगर

अहिल्यानगर अहमदनगर मर्चंटस् को- ऑप. बॅंकेच्या चेअरमनपदी ज्येष्ठ संचालक संजय चोपडा यांची बिनविरोध निवड झाली आहे.

बॅंकेच्या चेअरमनपदाच्या निवडीसाठी संचालक मंडळाची सभा मंगळवारी ( दि. ३० ) जून रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे सहाय्यक उपनिबंधक गणेश औटी याच्या उपस्थितीत पार पडली.

या सभेत चेअरमनपदासाठी ज्येष्ठ संचालक संजय चोपडा यांच्या नावाची सूचना संचालक मोहन बरमेचा यांनी मांडली. त्यास संचालक व माजी चेअरमन अनिलकुमार पोखरणा यांनी अनुमोदन दिले.

त्यानंतर सहाय्यक उपनिबंधक श्री. औटी यांनी चोपडा यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी नूतन चेअरमन चोपडा यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संचालक मंडळातील सर्व सदस्य तसेच बॅंकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते..

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे