ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

लग्नाच्या वरातीत नवरदेवाच्या वडिलांसह दोन भावांना मारहाण

अहिल्यानगर

लग्नाचा मांडव, सनईचे सूर अन् डीजेच्या तालावर थिरकणारी वरात… सतेचीवाडीत आनंदाचा पूर आला होता. पण, तितक्यात नवरीचा मद्यधुंद चुलत भाऊ डझनभर गुंडांना घेऊन वरातीत घुसतो अन् थेट नवरदेवाच्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालतो… क्षणात वरातीचा थरार होतो. संगमनेर तालुक्यातील सतेचीवाडी (शेंडेवाडी) येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

​पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथील रहिवासी शिवाजी यमाजी पवार (वय ४८) यांच्या मुलाचा विवाह २२ जून रोजी पार पडला होता. लग्न आटोपून रात्री ११:१५ च्या सुमारास घरासमोर वरातीचा जल्लोष सुरू होता. याच वेळी नवरीचा चुलत भाऊ मनोहर नामदेव दुधवडे (रा. पारदरा, पारनेर) हा त्याच्या १० ते १५ मद्यधुंद मित्रांसह तेथे धडकला.

त्यांनी पूर्ववैमनस्यातून किंवा किरकोळ वादातून नवरदेवाच्या नातेवाईकांना दगड आणि काठ्यांनी मारहाण सुरू केली.

​हा वाद सोडवण्यासाठी नवरदेवाचे वडील शिवाजी पवार आणि मुले योगेश व प्रदीप मध्यस्थी करायला गेले. मात्र, नशेत धुंद असलेल्या मनोहरने थेट शिवाजी पवार यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने जीवघेणा प्रहार केला.

तसेच इतर तरुणांनी दोन्ही भावांना गाडीच्या रॉडने बेदम चोप दिला. “पोलीस ठाण्यात तक्रार दिली, तर संपूर्ण कुटुंबाला ठार मारू” अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले.

​या प्रकरणी घारगाव पोलिसांनी मुख्य आरोपी मनोहर दुधवडे व त्याच्या १० ते १५ मित्रांवर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आदिनाथ गंधाले पुढील तपास करत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे