ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

पद्मशाली युवाशक्ती ट्रस्ट, नगर शहर पद्मशाली महिला शक्ती यांच्या कडून श्री मार्कंडेय विद्यालय नगर येथील विद्यार्थ्यांना वही वाटप..

अहिल्यानगर - वही वाटप 2026 (वर्ष 10 वें)

आज दिनांक 25/ 6 /2026 रोजी श्री मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ,गांधी मैदान ,अहिल्यानगर येथे पद्मशाली युवा ट्रस्टच्या वतीने विद्यालयातील इयत्ता 5 वी ते 8 वीच्या गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त तथा माजी अध्यक्ष व विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री सिद्धम सर उपस्थित होते.

युवा शक्तीचे श्री दीपक गुंडू ,श्रीनिवास इप्पलपेल्ली, श्री सुमित इप्पलपेल्ली, श्री योगेश म्याकल व विराज म्याना उपस्थित होते. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री छिंदम सर यांनी पद्मशाली युवाशक्ती ट्रस्टच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाबाबत माहिती दिली. व त्यांच्या कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमास विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री गोने सर ,पर्यवेक्षक श्री चन्ना सर ज्येष्ठ अध्यापिका सौ खरदास मॅडम ,श्रीमती राठोड मॅडम, श्री गालपेल्ली सर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे