ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

तुकाराम मुंढें नी हॉटेल्स-रेस्टॉरंट्स-धाब्यांसाठी नवे नियम जाहीर

अहिल्यानगर

अन्न व औषध प्रशासनाने राज्यात ‘सुरक्षित अन्न, ‘निरोगी महाराष्ट्र’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. तर जे कोणी नियमांचं उल्लंघन करतील अशा हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, धाबे मालकांना सोडणार नाही, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलाय.

हॉटेलवाल्यांना इशारा देतानाच तुकाराम मुंढेंनी हॉटेलसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. एफडीएने आखून दिलेल्या नियमानुसार हॉटेल्सचे किचन नसेल.त्यामध्ये अस्वच्छता दिसल्यास कुणालाही सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे आरोग्य विषयी नियमांचं पालन करताना काही नियम ठरलेले आहेत, त्या नियमांचं सर्वांनी पालन करणं बंधनकारक असेल.

जर नियमांचं पालन केलं तर घाबरण्याचं कारण नाही. पण नियमांचे उल्लंघन केले तर तुम्हाला कोणीच वाचवू शकणार नाही, असा कडक इशारा मुंढे यांनी दिला आहे.

एफडीएच्या नियमांनुसार हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, इटरीज, धाबे, मिठाईवाले, बेकऱ्या आणि ज्या ठिकाणी अन्नावर प्रक्रिया केली जाते, त्यांचे किचन म्हणजे स्वयंपाक घर कसं असावं, त्या संबंधित नियम काय आहेत याची माहितीही त्यांनी आज दिली आहे.

● भिंती आणि फ्लोअर या टाईल्सच्या असाव्यात. त्या टाईल्स वॉशेबल असाव्यात. त्यातून पाणी झिरपू नये.

● किचनमध्ये पुरेशी हवा खेळती हवी. तसेच किचनला एक्झॉस्ट असावा.

●कच्चा मालासाठी वेगळा सेक्शन असावे.

● स्वयंपाक तयार करण्यासाठी वेगळा सेक्शन असावे. यात कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगळे असावे.

● किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अन्न वेगवेगळे ठेवले पाहिजेत. इलेक्ट्रॉनिक फ्लाय ट्रॅप बसवावेत.

 

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

ए आर डिजीटल न्यूज लेडीज स्पेशल चॅनेल

AR न्युज चॅनेल फक्त महिलांसाठी चे न्युज चॅनेल नसून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील विशेष न्यूज आजपर्यंत कव्हर केअर कव्हर केले आहेत.. त्यासोबतच विशेष मुलाखत, लेखन, स्वरचित कविता, तसेच सर्व क्षेत्रातील इव्हेंट साठी संपुर्ण मिडीया कव्हरेज, व्यावसायिक डिजीटल जाहिरात ही प्रसिद्ध केलेले आहेत ... AR news चॅनेल फक्त लोकल न्यूज नेटवर्क नसुन एकमेव चॅनेल अहिल्यानगर मधील खास महिलांसाठी डिजिटल मिडिया चे काम करते. तसेच महिलांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन आणि हक्काचे व्यासपीठ आहे. https://ardigitalnews.com - News portal link https://www.youtube.com/@ARNewsshrutiBattin - YouTube channel link

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे