ए आर डिजीटल न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंगमहाराष्ट्रसामाजिक

पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाच्या वतीने कत्वृर्त्ववान व पदोन्नतीधारकांचे सन्मान कार्यक्रम संपन्न

सोलापूर

पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाचे वतीने समाजातील कत्वर्तत्ववान व पदोन्नती धारकांचे सन्मान कार्यक्रम संघाचे कार्यालयांत कार्याध्यक्ष सुरेश श्रीराम यांचे अध्यक्षतेखाली आणि अध्यक्ष श्रीहरी कुरापाटी , कार्यकारी सदस्या संगीताताई इंदापुरे, अरूणा कन्ना आणि भारती सग्गम यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाले.

प्रथम मान्यवरांचे उपस्थितीत श्री मार्कंडेय प्रतिमा पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यांत आले. त्यानंतर अनिल कन्ना यांनी स्वागत आणि प्रस्तावनेत संघाची माहिती दिली. सर्व प्रमुख पाहूण्यांचे शाल व बुके देऊन सत्कार केले.

कर्तृत्ववान व पदोन्नती धारकाचे सत्कार अमर जिंदम ( LLM मध्ये गोल्ड मेडल प्राप्त ), सौ.स्वप्ना सादूल ( इकाॅनामिक्स विषयांत P.HD. ), कु.श्रीलेखा गुंटूक ( नीट परीक्षेत 412 गुणांने पास), राजमहिंद्र येमूल ( राष्ट्रीय पाॅवर लिप्टींग स्पर्धेत 60 ते 70 वयोगटात 63 किलो गटात गोल्ड मेडल ) ,उमा कोटा ( भु.म.कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य पदी पदोन्नती ) , भाग्यलक्ष्मी जन्यारम ( अरकाल प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका पदी पदोन्नती ) , श्रीकांत दासरी ( कनिष्ठ लेखापाल पदी पदोन्नती ),कु.अनुष्का अरकाल ( भरत नाट्यम मध्ये नॅशनल व इंटर नॅशनल आवार्ड प्राप्त ) असे आठ जणांचे मान्यवरांचे हस्ते शाल व बुके देऊन सत्कार करण्यांत आले.

यावेळी सर्व सत्कार मुर्तींनी त्यांचा सत्कार केलेबद्दल संघाचे आभार मानले. संघाचे अध्यक्ष श्रीहरी कुरापाटी यांनी यांनी सर्व सत्कार मुर्तींचे अभिनंदन करून पुढील वाटचाली स शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश श्रीराम यांनी संघाचे कामकाज पाहून समाधान व्यक्त केले. कार्यक्रमांस सचिव यशवंत इंदापुरे,सहसचिव सत्यनारायण बरदेपूर, खजिनदार उमापती मिठ्ठापल्ली, कार्यकारी सदस्य अंबादास इंदापुरे, श्रीनिवास वल्लाकाटी, अनिल जन्यारम, नागेश कोंगारी, लक्ष्मीबाई तुम्मा, वरलक्ष्मी गोटीपामूल, सुरेखा गोली, वरलक्ष्मी पल्ली,नागनाथ वड्डेपल्ली, अविनाश संगा, विवेकानंद कोटा, सुनिल माडा, चंद्रकांत गंजी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होणेसाठी सचिव यशवंत इंदापुरे,भास्कर अल्ली, देविदास मेरगू, शाम बेनगिरी अंबादास कंची, श्रीनिवास बोलाबत्तीन, सुशिलकुमार चिलका यांनी परीश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनिल कन्ना यांनी केले तर आभार भारती सग्गम यांनी मांडले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे